Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉकरोच जनता पार्टीला आता राजकीय समर्थन

कॉकरोच जनता पार्टीला आता राजकीय समर्थन

लोकशाही न्यूज नेटवर्क

संपू्र्ण देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा रंगली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला होता, त्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे.

देशभरातील तरूणांची साथ या पार्टीला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये या पार्टीने भाजप आणि काँग्रेसला सोशल मीडियावरील फॉलोअर्सबाबत मागे टाकले होते. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीला राजकीय नेत्यांकडूनही समर्थन मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या पार्टीचे समर्थन केले आहे. या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांना म्हणाले की, 'काळजी करू नका, कोणतीही अडचण असल्यास संपर्क करा.' याआधी प्रकाश आंबेडकर यांनी, देशाच्या सीजीआयने माफी मागावी. त्यांनी केलेलं विधान हे त्या याचिकेबद्दल होत हे त्यांनी सांगायला हवं होत असं विधान केले होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही कॉकरोच जनता पार्टीचे समर्थन केले आहे. अण्णा हजारे यांनी म्हटले की, न्यायाधीशांनी युवकांना झुरळ कोणत्या उद्देशाने म्हणाले याबाबत विचार करावा लागेल. मात्र, याच झुरळ जनता पार्टीच्या मागे युवक उभे राहिले हे महत्त्वाचे आहे. झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसलं, तरी जनता या पार्टीच्या मागे उभी राहिली हे महत्वाचे आहे. युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही.'

पुढे बोलताना हजारे यांनी म्हटले की, 'केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा आहे. लोकायुक्त कायदा हा जरी संमत झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय?' असा सवालही अण्णा हजारेंनी उपस्थित केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live