लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'समान नागरी कायद्या'बाबतच्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील एनडीए आघाडीतही यावरून मतभेद दिसून येत आहेत.
जेडीयू नेते श्याम रजक यांनी स्पष्ट केले आहे की, हा कायदा बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत लागू केला जाणार नाही.
जेडीयूपाठोपाठ भाजपचे मित्रपक्ष असलेल्या चिराग पासवान यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिराग पासवान यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष समानता आणि विविधता या दोन्ही गोष्टींसाठी कटिबद्ध आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, समान नागरी संहितेचा मसुदा जाहीर झाल्यानंतर त्यांचा पक्ष आपली भूमिका मांडलीय.
आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये चिराग पासवान म्हणाले, “भारताची सामाजिक वीण वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक घटकाच्या स्वतःच्या नागरिक परंपरा आणि प्रथा आहेत.” संविधानाने हे मान्य केलंय. पाचवी आणि सहावी अनुसूची, अनुच्छेद ३७१-ए आणि ३७१-जी, तसेच आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या प्रत्येक कायद्यात अनुसूचित जमातींना देण्यात आलेली सवलत हे याचे पुरावे आहेत. माझा पक्ष, ‘लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)’, समानता आणि विविधता या दोन्ही गोष्टींसाठी कटिबद्ध आहे. या मसुद्याचे सार्वजनिकरीत्या प्रकाशन केले जावे, सर्व संबंधित घटकांच्या हिताचा विचार केला जावा आणि व्यापक स्तरावर चर्चा व सल्लामसलत केली जावी.

