Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोदींना झालमुडी देणारा विक्रेता अडचणीत : थेट धमक्या

मोदींना झालमुडी देणारा विक्रेता अडचणीत : थेट धमक्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

श्चिम बंगाल मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर झालमुडी खाऊ घालणारे स्थानिक विक्रेते बिक्रम साऊ यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या झाडग्राम येथील निवडणूक सभेनंतर त्यांचा ताफा परत जात असताना अचानक झालमुडी विक्री करणाऱ्या बिक्रम साऊ यांच्या दुकानाजवळ थांबला होता. यावेळी त्यांनी स्वतः तयार केलेली झालमुडी पंतप्रधानांना दिली होती. या घटनेचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बिक्रम साऊ यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

मात्र ही प्रसिद्धी आता त्यांच्या अडचणी वाढवणारी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे कॉल पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येत असल्याचा दावा केला जात आहे.

या धमक्यांमुळे त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिक्रम साऊ यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरातही चिंता व्यक्त केली जात असून अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचा फटका सामान्य विक्रेत्याला बसल्याची चर्चा सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live