Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ!

मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ!

डेंग्यू-चिकुनगुनियाला मात्र आळा : महानगरपालिकेचा अहवाल

मुंबई - मुंबई यंदा मलेरियाच्या आजाराने डोकेवर काढले असून मागील वर्षीच्या 9 महिन्यातील आजारांच्या तुलनेत या वर्षीच्या 9 महिन्यांत मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षीच्या जाने ते 15 सप्टेंबर 2025मधील 6,277 रुग्णांच्या तुलनेत यंदाच्या या कालावधीत 8,723 रुग्ण आढळले आहेत. तर जून ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत 5,984 एवढे मलेरियाचे रुग्ण होते. दुसरीकडे, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि कोविड-19 या आजारांच्या रुग्णसंख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येते.
मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या पावसाळाजन्य आजारांच्या मासिक तुलना अहवालानुसार, यंदा जानेवारी ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या 6,277 रुग्णांच्या तुलनेत यंदा 8,723 रुग्ण आढळले आहेत. तर जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 4304 मलेरियाचे रुग्ण होते आणि आणि जून ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये 5984 मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेक्टर नियंत्रण कार्यवाहीअंतर्गत मलेरिया नियंत्रणासाठी 21,665 जलस्रोतांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 3,367 ठिकाणी ॲनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळली. डेंग्यू नियंत्रणासाठी 4 लाख 68,993 उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात आली असून 11,776 ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली. यादरम्यान 669 जुने टायर आणि 22,344 भंगार वस्तू काढून टाकण्यात आल्या. तसेच 20,723 इमारत परिसरांत व 3,29,716 झोपड्यांमध्ये धूरफवारणी करण्यात आली.
अहवालानुसार डेंग्यूचे रुग्ण गेल्या वर्षीच्या 2,724 वरून यंदा 2,646 पर्यंत घटले आहेत, तर चिकुनगुनियाचे रुग्ण 542 वरून थेट 80 पर्यंत खाली आले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे प्रमाणही 558 वरून 390 पर्यंत कमी झाले आहे. मात्र एच1एन1च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, ती 83 वरून 507 पर्यंत पोहोचली आहे. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व प्रभागांमध्ये विविध सार्वजनिक आरोग्य जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत. गणेश मंडळांना ‌'आयईसी‌' भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले असून, मलेरिया व डेंग्यू याबाबत जनजागृतीपर जिंगल्सही वाजवली जात आहेत. 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत पालिकेने 5 लाख 94 हजार 269 घरांचे सर्वेक्षण करून 27 लाख 93 हजार 193 नागरिकांची तपासणी केली. या काळात 32,114 रक्तनमुने घेण्यात आले, तर लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार 9,842 नागरिकांना देण्यात आले. आरोग्य विभागाने नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देण्याचे, जुने टायर-टाक्या-भंगार वस्तू साठवून न ठेवण्याचे आणि दिवसा-रात्री मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live