Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"पंतप्रधान महोदय, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?"

"पंतप्रधान महोदय, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?"

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांपूर्वी नॉर्वे दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी महिला पत्रकार हेले लेंग यांनी यांनी मोठ्याने ओरडून एक प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर न देताच पंतप्रधान मोदी निघून गेले होते.

त्यानंतर हेले लेंग ही पत्रकार जगभरात व्हायरल झाली. भारतामध्येही याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. हेले लेंग यांच्या अडचणी वाढल्याचे समोर आले आहे. हेले लेंग यांचे फेसबुक आणि इंस्ट्रग्राम उकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. हेले लेंग यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

ओस्लो येथे भारत आणि नॉर्वे या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. ही परिषद संपवून पीएम मोदी बाहेर पडत होते, त्यावेळी नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लेंग यांनी त्यांना मोठ्याने ओरडून प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, “पंतप्रधान महोदय, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?” या घटनेचा काही सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि हेले लेंग एका रात्रीत इंटरनेटवर स्टार बनल्या होत्या. पण त्यानंतर काही तासांतच हेले लेंग यांचे सोशल खाती सस्पेंड झाली आहेत.

पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारल्यानंतर या परदेशी पत्रकाराला भारतातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर, मेटा कंपनीने त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट अचानक सस्पेंड (ब्लॉक) केले आहेत. स्वतः हेले यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “माझं फेसबुक आणि इन्स्टा अकाऊंट ब्लॉक झालंय. मला अनेक भारतीयांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची होती, पण आता त्याला उशीर होईल. पण मी यामुळे दुःखी नाही, कारण प्रेस फ्रीडम म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मला मोजावी लागलेली ही खूप छोटी किंमत आहे.”

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live