Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फडणवीसांना उपपंतप्रधानपद देण्यासाठी संघात हालचाली?

फडणवीसांना उपपंतप्रधानपद देण्यासाठी संघात हालचाली?

लोकशाही न्यूज नेटवर्क

क बडा नेता लवकरच उपपंतप्रधान होणार आहे. मोदींचा वारसदार म्हणून या व्यक्तीला उपपंतप्रधान बनवावं असं संघाच्या गोटात घटत आहे. त्यामुळेच मोदी सरकारचा विस्तार रखडला आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांचा सर्व रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने आहे. फडणवीस यांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचंच राऊत यांनी म्हटलंय. लवकरच त्याबाबची माहिती समोर येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस उपपंतप्रधान होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगू लागली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. पीएम इन वेटिंग असलेले लोक कधीच पंतप्रधान होत नाहीत, असा या देशाचा इतिहास आहे. आणि सध्या तरी देशात पंतप्रधान पदासाठी कोणतीच व्हॅकन्सी नाहीये, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत दिली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. यावेळी राऊत यांनी चार मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही मोठा खुलासा केला आहे.

फडणवीस यांना दिल्लीत बोलावणार आणि मोठी जबाबदारी देणार आहेत. संघाच्या आतल्या गोटातील माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळात नसलेल्या आणि दिल्लीत कार्यरत नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. मोदींचा वारसदार म्हणून जी व्यक्ती येणार आहे, त्या व्यक्तीला आधी उपपंतप्रधान करावं अशी संघाची भूमिका आहे. संघाच्या गोटात तसं घटत आहे. मी तुम्हाला जी माहिती देतोय, ही माहिती लवकरच समोर येईल, असा दावा राऊत यांनी केला.

पंतप्रधान पदाच्या वेटिंगमध्ये अमित शाहच

देशात पंतप्रधान पदाची आणि गृहमंत्रीपदाची व्हॅकन्सी आहे. फडणवीस यांना माहीत नसेल तर मी त्यांना माहिती देऊ शकतो. सध्या देशात पंतप्रधान पदाच्या वेटिंगमध्ये अमित शाहच आहेत. या देशाचा गृहमंत्रीपदावर राहिलेली व्यक्ती पंतप्रधान झाल्याची माहिती नाही. सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. अमित शाह हे प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं ते मानतात. लोक मानत नाही. ते पंतप्रधान होणार नाही. दुसरे राजनाथ सिंह आहे. त्यांच्याबद्दल साशंकता आहे, असं राऊत म्हणाले.

फेरबदल करायचे असेल तर शाहांचा राजीनामा..

संघाने उपपंतप्रधानपदाची नियुक्ती करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळेच केंद्रातील विस्तार रखडला. विस्तार करताना काही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतात. पण वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आधी शाह यांचा राजीनामा घ्या. मग आम्ही राजीनामा देतो. शाहांपासून सुरुवात करा, असं या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांच्या पेक्षा अधिक काळ सत्तेत घालवलेले हे मंत्री आहेत. फेरबदल करायचे असेल तर शाहांचा राजीनामा घ्या. नाही तर तुमच्या अधिकारात आम्हाला बरखास्त करा, असा पवित्रा या मंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळेच मोदी सरकारचा विस्तार रखडल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live