Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपळे खुर्द धरणातून बेकायदा मुरूम उत्खनन; जेसीबीसह डंपर जप्त

पिंपळे खुर्द धरणातून बेकायदा मुरूम उत्खनन; जेसीबीसह डंपर जप्त

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरणाच्या शासकीय जागेतून जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मुरूम खोदून डंपरमधून वाहतूक करताना अमळनेर पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले.

या कारवाईत जेसीबी आणि डंपरसह एकूण १८ लाख ११ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळे खुर्द धरणाच्या शासकीय जागेतून बेकायदेशीररीत्या गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, विनोद संदानशिव, सिद्धांत शिसोदे आणि सागर साळुंखे यांना घटनास्थळी पाठविले.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता जेसीबी क्रमांक एमएच ५४ बी १३२९च्या साहाय्याने धरणाच्या जागेतून मुरूम खोदण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच डंपर क्रमांक एमएच ४७ ई ३३०६मध्ये मुरूम भरला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी डंपरचालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रकाश कन्हैयालाल पाटील (वय ४५, रा. वाघोदे) असे सांगितले. तर जेसीबी चालकाने आपले नाव परेश दिलीप पाटील (वय २५, रा. सप्तशृंगी कॉलनी) असे सांगितले. दोघांकडे मुरूम उत्खनन व वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.

पोलिसांनी कारवाई करत ८ लाख ११ हजार ९२० रुपये किमतीचा डंपर आणि १० लाख रुपये किमतीचे जेसीबी मशीन असा एकूण १८ लाख ११ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश कन्हैयालाल पाटील आणि परेश दिलीप पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२), ३०५ (ई) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live