Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रायफली चोरण्यास आलेला चोरटा अटकेत!

रायफली चोरण्यास आलेला चोरटा अटकेत!

रणगाव ऑर्डनन्समध्ये दोन वर्षांपूर्वीही केली होती चोरी : संशयास्पद हालचालीवरून कारवाई

भुसावळ - तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील शस्त्रागारातून तीन एके-47 रायफल आणि दोन 5.56 गॅलील एस रायफलची चोरी सुमारे दोन वर्षांपूर्वी अर्थात 19 ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी झाल्याचे समोर आले होते.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेनंतर दहशतवादविरोधी पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करीत संशयीताला दोन रायफल्ससह अटक केली होती तर कारवाईपूर्वी आरोपीने तीन रायफल रेल्वे रूळावर बेवारसरित्या फेकून दिल्याचे कारवाईअंती समोर आले होते. दरम्यान, रायफलची चोरी करणारा संशयीत पुन्हा वरणगाव ऑर्डनन्सच्या परिसरात चोरीच्या उद्देशाने साथीदारासह दाखल झाल्याने त्याच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. 23 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयीत निलेश बळीराम ताटे आणि राजेंद्र श्रीधर कोळी (दोघे रा.तळवेल, ता.भुसावळ) यांनी ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने मनाई क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश केला. दोघेही सुरक्षा चौकी क्रमांक 6 आणि 7 यांच्या मधील संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस संशयास्पद हालचाली करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक अभिजीत गौरनपद नंदी यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात शासकीय गुपिते अधिनियम 1923 चे कलम 3 सह बीएनएस कलम 329(3), 303, 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरक्षा व्यवस्था वाढवली
ऑर्डनन्स फॅक्टरीचा परिसर हा संरक्षण विभागाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जात असल्याने तेथे सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास सक्त मनाई आहे. परिसरात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, सुरक्षा चौक्या आणि सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. अशा ठिकाणी परवानगीशिवाय प्रवेश करून संशयास्पद हालचाली करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर संबंधित घटनेची माहिती वरणगाव पोलिसांना देण्यात आली तर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी चोरल्या रायफली
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून देशाच्या लष्करासाठी एके 47 रायफलच्या गोळ्या (काडतूस) तयार केल्या जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर सिमेवर पाठवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच एके 47 या रायफलद्वारे चाचणी घेतली जाते. या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच रायफलींची निर्माणीच्या शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान घडली होती. दरम्यान, अटकेनंतर आरोपीने चोरी केलेली एके 47 व गलील रायफल काढून दिली होती तसेच जाडगाव रेल्वे रूळावर तीन रायफली फेकून दिल्याची त्यावेळी कबुली दिली होती. आरोपी थाटे हा पुन्हा वरणगाव ऑर्डनन्स परिसरात साथीदारासह चोरीच्या उद्देशाने आल्याने आता पोलिसांनी चोहो बाजूने तपासाला वेग दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live