Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रेल्वे ट्रॅकजवळ भीषण स्फोट : २३ ठार

रेल्वे ट्रॅकजवळ भीषण स्फोट : २३ ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानच्या क्वेटा शहरात रेल्वे ट्रॅकजवळ एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात 23 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 47 लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरात धावपळ उडाली.

सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सरकारी रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या स्फोटामुळे एक मालगाडी रुळावरून घसरली. रिपोर्ट्सनुसार, ही ट्रेन क्वेटा कँट परिसराच्या दिशेने जात होती, तेव्हाच रेल्वे लाईनवर हा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात गोळीबाराचे आवाजही ऐकू आले, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

बलुचिस्तान सरकारचे अधिकारी बाबर युसूफजई यांनी सांगितले की, पोलीस, सुरक्षा दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आहेत. हा स्फोट कसा झाला, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे बऱ्याच काळापासून हिंसाचार आणि फुटीरतावादी कारवाया सुरू आहेत. येथे अनेक संघटना पाकिस्तान सरकारविरुद्ध लढा देत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live