Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'संस्कारी बाबूजी'वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप

'संस्कारी बाबूजी'वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप

लोकशाही न्यूज नेटवर्क

2018 मध्ये बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेचं वादळ आलं आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा काळा चेहरा समोर आला. अनेक महिलांनी इंडस्ट्रीतील पुरुषांवर लैगिंक अत्याचाराचे आरोप केले.

या सेलिब्रिटी पुरुषांमध्ये सिनेविश्वातीस 'संस्कारी बापूजी' अलोकनाथ यांचं देखील नाव होतं. रुपेरी पड्यावर 'संस्कारी बापूजी' ही ओळख निर्माण करण्यासाठी अलोकनाथ यांना अनेक वर्ष लागली, पण महिला फिल्ममेकरने केलेल्या आरोपांनंतर त्यांची प्रतिमा धुळीस मिळाली. अलोकनाथ यांच्या अभिनेत्री आणि त्यांच्यासोबत काम करण्याऱ्या अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यामध्ये फिल्ममेकर आणि लेखिका विनता नंदा यांचं देखील नाव आहे.

फेसबूकवर पोस्ट करत पोलखोल!

विनता यांनी फेसबूकवर मोठी पोस्ट करत धक्कादायक खुलासा केला. यामध्ये विनता यांनी बलात्काराचे देखील आरोप केले. विनता यांच्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. तर जाणून घ्या विनता फेसबूक पोस्ट करत म्हणाल्या, 'ती तेव्हाची घटना आहे जेव्हा अलोकनाथ माझ्यासोबत 'तारा' मालिकेत काम करत होते. एकदा त्यांनी घरात पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीत अलोकनाथ यांची पत्नी नव्हती. पण पार्टीसाठी अनेक जण उपस्थित होते, त्यामुळे काही संशयास्पद आहे, असं वाटलं नाही. पण जेव्हा पार्टीमध्ये मी ड्रिंक्स घेतले, तेव्हा मला काही गडबड वाटली. अखेर रात्री 2 वाजता मी मी पार्टीतून निघाली. कारण मला चांगलं वाटत नव्हतं…'

विनता पुढे लिहितात, 'कोणीच मला म्हणालं नाही की, तुला घरा ड्रॉप करतो आणि मी पायी पुढे चालत आहे. रिक्षा आणि टॅक्सी देखील मला मिळाली नाही. माझं घर दूर होतं. तेव्हा अलोकनाथ त्यांची कार घेऊन आले आणि मला म्हणाले, चल घरी सोडतो… मी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि घरी निघाली. मी नशेत असताना पुढे काय झालं मला माहिती नाही. पण मला एवढं आठवत होतं की, रात्री माझ्या तोंडात बळजबरी दारु टाकली होती.'

'दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर माझं संपूर्ण शरीर प्रचंड दुखत होतं… तेव्हा मला कळलं होतं की माझ्याच घरी, माझ्यावर बलात्कार झाला आहे.' विनता यांनी सांगितल्यानुसार, अलोकनाथ यांनी त्यानंतर मला अनेकदा घरी बोलावून माझ्यावर अत्याचार केले. पण तेव्हा मी काहीच बोलू शकली नाही. कारण मला तेव्हा पैशांची गरज होती… काही दिवसांनंतर विनता यांना मालिकेतून काढून टाकलं, कारण त्या अलोकनाथ यांचा विरोध करु लागलेल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live