Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून हल्लाबोल!

शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून हल्लाबोल!

लंडनचे यश खुपते, म्हणून पोटात दुखते अशी बोचरी टीका : सोशल मीडिया खात्यावरून मार्मिक भाष्य

मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एका खोचक व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेने या व्यंगचित्रातून सडेतोड उत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आलेल्या या मार्मिक व्यंगचित्रात टीव्हीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशाची बातमी सुरू असल्याचे दाखवले आहे. ‌'ब्रेकिंग न्यूज: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये 3 पुरस्कारांनी सन्मान!‌' अशी बातमी टीव्ही स्क्रीनवर झळकत आहे. ही बातमी पाहताच उद्धव ठाकरे यांच्या पोटात तीव्र कळा येत असून ते हतबल होऊन टीव्ही बंद करण्यासाठी सांगत आहेत, असे या चित्रात रेखाटण्यात आले आहे.
"बंद कर तो टीव्ही, पोटात कळ मारते माझ्या ह्यांची प्रगती बघून!" असा संताप आणि मळमळ व्यक्त करणारा संवाद या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या तोंडी देण्यात आला आहे. यातून ‌'शिंदेंचे यश पाहून विरोधकांच्या पोटात कसे दुखत आहे‌' असा थेट आणि बोचरा वार शिवसेनेने केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेचा खरपूस समाचार घेण्यासाठी शिवसेनेने या व्यंगचित्राचे अस्त्र उगारले आहे.
दुसऱ्याची प्रगती आणि यश न पचल्याने विरोधकांना कशी ‌'राजकीय पोटदुखी‌' जडली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live