Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
थकीत पगार मागितला अन् मालकाने ठेचून संपवला

थकीत पगार मागितला अन् मालकाने ठेचून संपवला

मुक्ताईनगर

कीत पगाराची मागणी केल्याचा राग मनात धरून हॉटेल मालकाने मजुराच्या डोक्यात लाकडी काठीने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर-बुऱ्हानपूर महामार्गावरील उचंदा शिवारात घडली.

या प्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. मृत मजुराचे नाव गोकुळ तारासिंग जाधव (वय 55, मूळ रा. निंबापूर, ता. खकनार, जि. बुऱ्हानपूर, ह.मु. पुर्णाड शिवार) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ जाधव हे पुर्णाड फाट्यावरील शेर-ए-पंजाब हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करत होते. शनिवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर-बुऱ्हानपूर महामार्गालगत उचंदा शिवारातील एकनाथ पाटील यांच्या शेताजवळील सिटिझन गॅरेज परिसरात त्यांनी हॉटेल मालक कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याकडे थकीत पगाराची मागणी केली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

संतापलेल्या कमलजितसिंग याने लाकडी काठीने गोकुळ जाधव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृताच्या पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय 55) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live