Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रोडवरील धाबेपिंप्री शिवारात सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन असलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याची घटना दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

या अपघातात दुचाकीवरील प्रल्हाद मधुकर हिवरे (वय 42, रा. अजंदे, ता. रावेर) यांचा मृत्यू झाला, तर ईश्वर नामदेव पवार (वय 40, रा. अजंदे, ता. रावेर) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर मार्गावरील धाबेपिंप्री शिवारातील नायगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन असलेल्या ट्रक क्रमांक एमएच 19 सीवाय 4617 वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकी क्रमांक एमएच 19 डीडी 1858 ला मागून धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या धडकेत प्रल्हाद हिवरे यांचा मृत्यू झाला, तर ईश्वर पवार हे जखमी झाले. जखमी पवार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी ईश्वर नामदेव पवार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालकाची ओळख व ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नसून, आरोपीला अटक झालेली नाही. घटनेचा पुढील तपास तुषार पाटील करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live