Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधानपरिषद निवडणुकीसाठी 'शिवसेना विरुद्ध शिवसेना'!

विधानपरिषद निवडणुकीसाठी 'शिवसेना विरुद्ध शिवसेना'!

लोकशाही संपादकीय लेख

विधानसभा परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जळगाव व विधानसभा मतदारसंघात भाजपने आपला दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही जागा भाजपची असून भाजपलाच ही जागा मिळाली पाहिजे असे भाजपचे म्हणणे आहे.

आज मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर सर्व आमदार, खासदार आणि महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची गोपनीय बैठक झाली. त्या बैठकीत जळगाव विधान परिषदेची जागा ही भाजपलाच मिळाली पाहिजे अशी मागणी केल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, असे सर्व खासदार आमदार व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर विधान परिषदेसाठी वरिष्ठ स्तरावर जो फॉर्मुला ठरला आहे. १२ भाजप, शिवसेना ३ व दोन जागा राष्ट्रवादीला मिळतील असा फॉर्मुला आहे. तसे झाले तर जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडे जाईल असे ठरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळणार नसल्याचे कळवते. परंतु भाजपला जरी ही जागा मिळाली असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजपकडे मागणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये डॉ. केतकी पाटील, पाचोर्‍याचे अमोल शिंदे, नंदू अडवाणी आदींचा देखील समावेश आहे. त्यामुळे अद्याप भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. परंतु ही जागा भाजपलाच हवी अशी मागणी होते आहे. तिकडे शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे की, जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी, अशी त्यांचे मागणी आहे. यावेळी ही जागा भाजपने शिवसेनेला सोडावी अशी मागणी खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यावेळी भाजप या मोठ्या भावाने शिवसेनेला जागा सोडावी, असे गुलाबराव पाटील यांचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली नाही तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवेल तसेच शिवसेनेचे प्रताप पाटील भाजप तर्फे निवडणूक लढवतील असेही बोलले गेले. पण या सर्व गोष्टी व्यर्थ ठरल्या आता शिवसेनेचे प्रताप पाटील यांचे विरोधात शिवसेनेचेच पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित पाटील याचे नावही पुढे आलेले आहे. म्हणजे शिवसेनेतच ही टक्कर निर्माण झाली आहे. याबाबत पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील हे म्हणाले की, माझा मुलगा २५ वर्षाचा आहे. तो जर तीस वर्षाचा असता तर मी एकटा कुणाचीही भीड भाड न करता निवडणूक लढवली असती. परंतु पण तो २५ वर्षाचा असल्याने मी गुलाबराव पाटील यांच्यावर सोडून देणार आहे. तुम्ही तुमच्या सद्सद बुद्धीला जे पटेल तो निर्णय घ्यावा. पण माझा मुलगा शिवसेनेतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. माझ्याकडे पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेत जोरदार यश मिळाले आहे. त्याबद्दल तो पाचोरा आणि भडगावच्या मतदारांचे आभार मानतो. माझा मुलगा सुमित जर तीस वर्षाचा असता तर मी निवडणूक लढवली असती. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मुलाचे उमेदवारी जाहीर करून वरिष्ठांकडे म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जो काही निर्णय घेतला त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी हा सर्वस्वी अधिकार शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्यावर अवलंबून आहे. ही जागा शिवसेनेने सुद्धा प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे जळगावची जागा आम्हालाच मिळावी असे शिवसेनेची मागणी आहे. परंतु भाजप म्हणजे म्हणते की, परंपरेने ही जागा भाजपची असल्यामुळे भाजपलाच ही जागा मिळाली पाहिजे. आता शिवसेना आणि भाजप यांच्यात ठरलेल्या फॉर्मुलानुसार जर जागावाटप झाली तर १२ भाजप, ३ शिवसेना आणि २ राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्या तर ही जळगावची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे..

शिंदे शिवसेना विधान परिषदेसाठी ७ जागांची मागणी करते आहे. ती मागणी त्यांनी लावून धरली आहे. तर महायुतीमध्ये म्हणजे भाजप व शिवसेनेमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. आज गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईकडे गेले आहेत. ही जागा शिवसेनेलाच मिळावी म्हणून ते वरिष्ठांकडे आग्रह धरणार आहेत. माझा मुलगा प्रताप हा जिल्हा परिषद सदस्य होता. त्याला ग्रामीण भागाचा अनुभव आहे. त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे जागा शिवसेनेला म्हणजे प्रताप पाटील यांना मिळावी असा आग्रह गुलाबराव पाटील हे वरिष्ठांकडे आणि आपले नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे कळते. जर ही जागा शिवसेनेला मिळाली नाही तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी शिवसेना व भाजपमध्ये फूट पडली असेल पण शिंदे सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जर या जागेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली तर भाजप आणि शिवसेनेत फूट पडून भाजप शिवसेना असा सामना रंगेल. यावेळी घोडेबाजाराला ऊत येईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. येत्या निवडणुकीच्या काळात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live