Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विजय थलपती यांच्या शपथविधीची जोरदार तयारी!

विजय थलपती यांच्या शपथविधीची जोरदार तयारी!

लोकशाही संपादकीय लेख

तामिळनाडूत विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ विधी घेणार आहेत. विजय थललपतींच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकून तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

एकूण 207 जागांच्या तामिळनाडू विधान सभेत टीव्हीके ने 108 जागा जिंकल्या आहेत. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने 59 तर ए आय एडीएम के पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाला पाच डाव्यांना चार आणि इतर पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. विजय थलपती यांच्या पक्षाला एकूण 108 जागा मिळाल्या असून सत्ता स्थापनेसाठी त्यांना जागांची आवश्यकता आहे. एकूण काँग्रेस डावे व अपक्ष मिळून 11 जागा आहेत. या छोट्या पक्षांनी जरी पाठिंबा दिला तरी त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते. त्याआधी विजय थलपती यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवार दिनांक 7 मे रोजी विजय थलपतींची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून इंडोअर स्टेडियम येथे त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री डीएमके पक्षाचे प्रमुख स्टॅलिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा विजय थलपतींच्या उमेदवारीकडून दारुण पराभव झाला हे विशेष होय. विजय थलपती यांच्या रूपाने एक दलित मुख्यमंत्री तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. विजय थलपतींनी दोन वर्षांपूर्वी आपल्या टीव्हीके पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी 108 जागा जिंकून घवघवीत यश प्राप्त केले. दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पक्षाला एवढे मोठे यश प्राप्त होईल हे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. त्यांनी आपल्या उमेदवारांना तिकीट देताना तो किती श्रीमंत आहे, किती पैसेवान आहे, ही पार्श्वभूमी तपासली नाही. जो टीव्हीके पक्षाशी एकनिष्ठ आहे, त्यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे त्यांच्या एका कार ड्रायव्हरच्या मुलाला त्याने तिकीट दिले आणि तो ड्रायव्हरचा मुलगा निवडून आला. त्यामुळे विजय थलपतींनी फार मोठ्या अवडंबराच्या गोष्टी केल्या नाहीत. विजय थलपती निवडून आल्यानंतर म्हणतो की, "मी एक सुपरस्टार आहे. तर तुम्ही मला निवडून देणारे प्रत्येक जण मेगा सुपरस्टार आहेत, असे मी मानतो.." 51 वर्षाच्या या सुपरस्टारला जीवनात अनेक खडतर प्रसंग आले आहेत. 1913 साली त्यांचा एक चित्रपट प्रसिद्ध होणार होता. त्याला तामिळनाडू सरकारकडून मान्यता देण्यात येत नव्हती म्हणून त्यावेळी मुख्यमंत्री जयललिता यांच्या केबिन बाहेर तासंतास बसला होता. त्यासाठी त्याला तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांना भेट दिली नाही. थेट नाकारली होती. हा एक अपमान विजय थलपती यांना होता. मात्र तो त्यांनी गिळला होता. त्यांच्या चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर तो आणि त्यांचा प्रोडूसर रस्त्यावर आले असते. त्यामुळे या चित्रपटाची टॅगलाईन बदलून घेतली. त्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित झाला. पण तो अपमान फार मोठा होता. ज्याला मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली त्याच विजय थलपती यांना आज देशातील अनेक मोठे नेते भेटण्यासाठी रांग लावत आहे. नियतीचा हा काय नियम आहे. म्हणजे 13 वर्षाच्या कालावधीत त्यांनी पूर्णपणे मेहनत करून यश प्राप्त केले.

तामिळनाडू सुपरस्टार मुख्यमंत्री बनण्याची एक परंपराच आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन हे सुद्धा पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेक त्यांच्या चाहत्यांनी आत्महत्या केल्या होत्या. इतकी लोकप्रियता निर्माण करण्यात एम रामचंद्रन यशस्वी झाले होते. ते म्हणतील ती पूर्व दिशा तामिळनाडूत असायची. त्यांचा शब्द परवलीचा मानला जायचा. त्यामुळे त्यांना विरोध असा नव्हताच. एकही राजकीय पक्ष त्यांच्या अंगालाही पुरत नव्हता. विरोधी पक्षाची कसलीच डाळ त्यांच्यासमोर शिजायची नाही. त्यांच्या निधनानंतर कुणाला मुख्यमंत्री करायचे, हे त्यांनी जाहीर केल्यावर जयललिता यांचीच निवड मुख्यमंत्री म्हणून झाली आणि त्याही मरेपर्यंत मुख्यमंत्री राहिला. त्यानंतर डीएमके पक्षाचे एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती. ते मरेपर्यंत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र स्टॅलिन हे मुख्यमंत्री झाले पण त्यांना तशी फार मोठी लोकप्रियता मिळाली नाही. परंतु तामिळनाडूच्या राजकारणात त्यांची छाप होती, हे नाकारता येणार नाही. आता त्यांचा पराभव झाला ही एक त्यांच्यासमोर नामुष्कीच झाली आहे. परत सुपरस्टार विजय थलपती यांचे राज्य सुरू झाले आहे. आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर आणि एकट्याच्या जीवावर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. आंबेडकरवादी विचारांचा पकडा असलेल्या विजय थलपती यांनी वैचारिक टप्प्याने फार मोठी बैठक प्राप्त केली आहे. त्यांनी महिलांना 2500 रुपये देण्याचे घोषित केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे करण्याची घोषणा केली आहे. हिंदू मुस्लिमांचा वाद निर्माण करण्यात विजय थलपतींना स्वारस्य नाही. दोन समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करणे हे त्यांना मान्य नाही. अशा या सुपरस्टारचे आज मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार होत आहे. त्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. एक नवा उदय त्यांच्या रूपाने होणार आहे..!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokshahi Live