Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 289 पदांकरिता मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा!  - PDCC Bank Recruitment 2026

१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 289 पदांकरिता मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा! - PDCC Bank Recruitment 2026

PDCC Bank Bharti 2026

PDCC Bank Bharti 2025: PDCC BankPune is going to recruit for various vacant posts of "Shipai". There are 289 vacancies available. The official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms.

Interested and eligible candidates can apply online through the given link before the 10th of August 2026. For more details about PDCC Bank Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अंतर्गत "शिपाई" पदांच्या 289 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बँक भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बँक भरती २०२६

  • पदाचे नाव - शिपाई
  • पदसंख्या - 289 जागा
  • शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण - पुणे
  • वयोमर्यादा - 18 - 38 वर्षे
  • परीक्षा शुल्क -1650/-(अधिक १८% जी.एस.टी. व सर्व्हिस चार्ज)
  • अर्ज पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - ऑगस्ट २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट - https://pdcc.bank.in/

PDCC Bank Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
शिपाई289

Educational Qualification For PDCC Bank Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिपाईउमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी. इयत्ता १२ वी) उत्तीर्ण असावा -किंवा १२ वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.

Salary Details For Pune Jilha Madhyavarti Sahakari Bank Arj 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिपाईRs.12,000/-

Offline Exam For PDCC Arj 2026

१. शिपाई पदाकरीता ७० गुणांची ओ.एम.आर. (Optical Mark Recognition) पध्दतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल.
२. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची राहील.
३. लेखी परीक्षेचे माध्यम मराठी राहील.
४. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ७० प्रश्नांचा समावेश राहील व प्रत्येक प्रश्नास १ गुण राहील.
५. लेखी परीक्षेकरीता एकूण ७५ मिनिटांचा कालावधी राहील.
६. लेखी परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील.

Important Date

How To Apply For PDCC Bank Application 2026

  • शिपाई पदाच्या सरळसेवा भरतीकरिता बँकेच्या https://www.pdcc.bank.in/careers आणि https://www.punedccbank.com या अधिकृत संकेत स्थळावरुन ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपुर्ण असल्यास तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपुर्ण प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. त्याचप्रमाणे ई-मेल आयडी व संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.
  • उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्र व पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपुर्वक संपुर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुकी झाल्यास किंवा त्रुटी राहिल्याने भरतीच्या कुठल्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. तसेच ऑनलाईन अर्जात एकदा भरलेली माहिती बदलता येणार नाही. विस्तृत माहितीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा इ. बाबतची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या https://www.pdcc.bank.in/careers आणि https://www.punedccbank.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. सदर ऑनलाईन अर्ज व सविस्तर सूचना संकेतस्थळावर लेखी परीक्षा शुल्क स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत खुले असेल.
  • ऑनलाईन अर्ज भरताना येणारा अडचणींचे निराकरण help@punedccbank.com या ई-मेलद्वारे व ८७९३६७५९०४ या हेल्पलाईनद्वारे करण्यात येईल. सदर हेल्पलाईन सकाळी ०७.०० वा. ते सायं. ०७.०० वा. सुरू असेल.
  • परीक्षा शुल्क भरणे: ऑनलाईन पध्दतीने.
    लेखी परीक्षा शुल्काची रक्कम ही फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येईल. लेखी परीक्षा शुल्क स्वीकारण्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.१) UPI, डेबिटकार्ड (Rupay/Visa/Master Card/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट (Gpay, Phone Pe, Bhim App इ.) वापरून परीक्षा शुल्क स्विकारण्यात येईल.२) परीक्षा शुल्क जमा झाल्यानंतर व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ई-पावती तयार होईल. सदर ई-पावती तयार झाल्यानंतर आपला व्यवहार यशस्वीरित्या पुर्ण झाला आहे, असे गृहीत धरावे.३) उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत प्रिंट करून घेणे आवश्यक आहे.

    ८. लेखी परीक्षा शुल्काचा भरणा हा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारेखपर्यंत तारेखपर्यंत सुरू राहील. परीक्षा शुल्क भरलेले उमेदवारच लेखी परीक्षेस पात्र राहतील.

  • उमेदवाराने सर्वप्रथम संकेत स्थळावरील विस्तृत माहि माहिती व सूचनांचे अवलोकन करून त्यानंतर (NEW REGISTRATION) ऑनलाईन या बटनावर क्लीक (Click) करावे. ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Payment Gateway) भरणा करून अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणा केल्याची प्रत स्वतः जवळ पदभरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने जतन जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
    १०. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर र करताना करताना करताना उमेदवाराने स्वतःचे अद्यावत ३.५ सें.मी. x ४.५ सें.मी. आकारातील "JPG/JPEG" या प्रकारामध्ये स्कॅन केलेले छायाचित्र (फोटो) व पांढऱ्या कागदावर काळया शाईच्या पेनाने स्वतः स्वाक्षरी करुन स्कॅन केलेली १.५ सें.मी. ३.५ सें.मी. आकारातील "JPG/JPEG" प्रकारची स्वाक्षरी स्कॅन करुन https://www.pdcc.bank.in/careers आणि https://www.punedccbank.com या संकेत स्थळावरील सूचनेनुसार विहीत पद्धतीने अपलोड करणे अनिवार्य आहे. छायाचित्र (फोटो) स्कॅन केलेल्या इमेजची फाईल साईज २० के.बी. ते ५० के. बी. च्या मध्ये असावी. तसेच स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या इमेजची फाईल साईज १० के. बी. ते २० के.बी.च्या मध्ये असावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pdcc.bank.in Job 2026

♦️Syllabus PDF
Download
PDF जाहिरात
https://lnk.ua/8Y013THqk
ऑनलाईन अर्ज करा
https://lnk.ua/nVkOdmH37
✅ अधिकृत वेबसाईट
https://pdcc.bank.in/
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti