Dailyhunt

३८०० पदांची मोठी भरती होणार, महापालिकेचा सुधारित आकृतिबंध मंजुरीच्या टप्प्यात - Nashik Mahanagarpalika Bharti 2026

Nashik Mahanagarpalika Bharti 2026

Nashik Mahanagarpalika Bharti 2026 - Friends, if you are currently in search of a job, there is important news for you. It is understood that a major recruitment drive for 3,800 posts is set to commence soon in Nashik.

This is because a substantial total of 3,800 posts are currently lying vacant within the Municipal Corporation. Consequently, there is an expectation that these vacancies be filled as expeditiously as possible. The revised organizational structure-encompassing 8,877 posts across various cadres-proposed by the Nashik Municipal Corporation is currently in the final stages of receiving approval from the State Government. In the interim, with specific government approval, the recruitment process for 114 posts in technical cadres and 186 posts in the Fire Services Department is currently in its final stages under Nashik Mahanagarpalika Bharti 2026. Meanwhile, the process for approving the Nashik Municipal Corporation’s revised organizational structure gained significant momentum after Chief Minister Devendra Fadnavis announced in the State Legislature a plan to fill 70,000 vacant posts across various Local Self-Government Bodies within the state.

मित्रांनो, जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच नाशिक मध्ये ३८०० पदांची मोठी भरती सुरु होणार असल्याचे समजते. कारण सध्या महापालिकेत मोठ्या प्रमाणात एकूण ३८०० पदे रिक्त आहेत. आणि हि रिक्त पदे लवकरात लवकर भरणे अपक्षीत आहे. नाशिक महापालिकेचा विविध संवर्गातील ८८७७ पदांचा सुधारित आकृतिबंध राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. या आकृतिबंधातील सर्व त्रुटींची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भातील संचिका नगरविकास विभागाच्या सचिवांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे वृत्त आहे. नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांत नोकरभरती झालेली नाही. नाशिक महापालिकेचा समावेश ब वर्गीय महापालिकेत असला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र क वर्गीयच आहे. सद्यस्थितीत या आस्थापना परिशिष्टावरील ७७२५ मंजूर पदांपैकी सुमारे ३८०० पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. ब वर्गीय आस्थापनेनुसार महापालिकेने सुधारित आकृतिबंध तयार करून शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. मात्र, आठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही या आकृतिबंधाला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. तूर्त शासन मंजुरीने तांत्रिक संवर्गातील ११४, तर अग्निशमनच्या १८६ पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ७० हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा विधिमंडळात केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या सुधारित मंजुरीच्या प्रक्रियेला वेग आला होता. नगरविकास विभागाच्या सूचनांनुसार महापालिकेने आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आता यासंदर्भातील संचिका अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयात सचिवांच्या टेबलवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनपातील मनुष्यबळाची सद्यस्थिती – महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७,७२५ पदे मंजूर आहेत. दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ३ हजार ८०० पदे रिक्त असून, जेमतेम चार हजार कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. यात १,९६० सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत महापालिकेचा आस्थापना खर्च लक्षात घेता आकृतिबंध मंजूर झाला तरी त्यानुसार नोकरभरतीची मान्यता मिळणे मात्र कठीण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील ११४, तर अग्निशमन संवर्गातील १८६ पदांसाठी होऊ घातलेल्या नोकरभरतीसाठी मंगळवारी (दि. २४) ऑनलाइन लेखी परीक्षा होत आहे. नाशिकसह राज्यातील १३ शहरांतील २९ परीक्षा केंद्रांमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या परीक्षेस १९,४०० उमेदवार प्रविष्ट होणार आहेत.

नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांनंतर प्रथमच नोकरभरती होत आहे. नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी नाशिकबाहेरील केंद्रांना विरोध दर्शवित स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ही प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी महासभेत नगरसेवकांकडून करण्यात आली होती. परंतु सिंहस्थासाठी ही भरती आवश्यक असल्यामुळे तसेच प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने ती स्थगित करण्यास प्रशासनाने असमर्थता प्रकट केल्याने महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिला.

ही परीक्षा राज्यातील एकूण १३ शहरांतील २९ परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आली असून, सर्व परीक्षार्थीना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) या पूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. परीक्षा केंद्रात वेळेपूर्वी पोहोचून ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

महापालिकेने ‘गट क’ संवर्गातील ११४ अभियांत्रिकी पदांसाठी (कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता) सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी अनुभवाची सक्तीची ठेवल्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. राज्यातील इतर महापालिकांनी अट अनुभवाची अट रद्द केलेली असताना नाशिक महापालिकेचा हा अट्टाहास नेमका कोणासाठी? असा प्रश्न स्थानिक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. मनपाने अभियांत्रिकीची ‘गट क’ संवर्गातील ११४ पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात दिली. यात कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्ष तर सहायक अभियंता या पदासाठी पाच वर्षांचा अनुभवाची अट टाकली आहे. ही अट अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन सरळ सेवा भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. अशाच प्रकारची अट राज्यातील पुणे, कल्याण-डोंबिवली, अमरावती, सोलापूर, जळगाव महापालिकांनी टाकली होती मात्र ती रद्द केली आहे. नाशिक मनपाने ही अट कायम का ठेवली? नेमकी कुणासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक मनपाने २०२३ मधील भरती प्रक्रियेत ही अट रद्द केली होती. आता ही अट कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे सिंहस्थाचे आव्हान पेलण्यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची ७३ पदे मानधनावर भरती प्रक्रिया वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. वैद्यकीयच्या ७३ पदांसाठी तब्बल १०७३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. एमबीबीएसच्या दहा जागांसाठी ३०, क्ष किरण तज्ञाच्या ३ जागांसाठी ५, बालरोगतज्ज्ञाच्या ८ जागांसाठी १३, मानसोपचारतज्ज्ञाच्या २ जागांसाठी ४, मानसशास्त्रज्ञाच्या २ जागांसाठी ३०, क्ष किरण तंत्रज्ञाच्या ५ जागांसाठी १७, एनएनएमच्या १० जागांसाठी ४४७, तर स्टाफनर्सच्या ३० जागांसाठी ५२२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज होत आहे. शासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीला मंजुरी मिळत नसल्याने, महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात ७३ पदांवर मानधनावर भरती सुरू केली आहे. या पदांसाठी १०७३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti