Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
७ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! जिल्हा न्यायालयात "सफाईगार" पदाची भरती सुरु!

७ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! जिल्हा न्यायालयात "सफाईगार" पदाची भरती सुरु!

BHC Safaiwala Recruitment Application Form - सातवी पास उमेदवारांना सरकारी नोकरीचो एक संधी चालून आली आहे. S ४ कॅटॅगिरी मध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय,यांच्या आस्थापनेवर 'सफाईगार' या पदासाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सातवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शासकीय सेवेत रुजू होण्याची ही एक उत्तम संधी चालून आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारांना एस-वन या वेतनश्रेणीनुसार १५ हजार ते ४७ हजार ६०० रुपये आणि नियमानुसार इतर शासकीय भत्ते मिळतील. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहचतील अशा बेताने केवळ स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करता येईल. चला या बद्दल पूर्ण माहिती बघूया!

मित्रांनो, या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी तसेच हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. जर उमेदवार उच्चशिक्षित असेल आणि त्याच्याकडे सातवीचे गुणपत्रक उपलब्ध नसेल, तर त्यांनी अर्जात काल्पनिकरीत्या ५० टक्के गुण नमूद करणे बंधनकारक आहे. याशिवाय उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी आणि त्याला शौचालय, स्नानगृह स्वच्छता, झाडू काम तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. न्यायालयात काम करण्याचा पूर्वअनुभव असणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य मिळणार आहे. हे पद एकाकी असल्याने भविष्यात या पदावर पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

तसेच लक्षात ठेवा, आप्लं वयोमर्यादेचा विचार करता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे, तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. अर्ज करण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क आकाराले जाईल. हे शुल्क ‘डिस्ट्रीक्ट अँड सेशन्स कोर्ट, बीड’ यांच्या नावे काढलेल्या पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपातच अर्जासोबत जोडावे लागेल. रोख रक्कम, धनादेश किंवा इतर मार्गाने पाठवलेले शुल्क स्वीकारले जाणार नाही आणि असे अर्ज बाद ठरवले जातील!!

न्यायालयाची हि भरतीची निवड प्रक्रिया ही एकूण ५० गुणांची असेल, ज्यामध्ये ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा, १० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी आणि १० गुणांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. प्रात्यक्षिक परीक्षेत किमान १५ गुण मिळवून उत्तीर्ण झालेले उमेदवारच पुढील शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील, तर शारीरिक चाचणीत किमान ४ गुण मिळवणारे उमेदवार अंतिम वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र मानले जातील. प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची अल्पसूची म्हणजेच शॉर्टलिस्ट तयार करून पुढील परीक्षेचे वेळापत्रक न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी न्यायालयाच्या ‘बीईईडी डॉट डीकोर्ट्स डॉट जीओव्ही डॉट इन’ या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून ए-फोर आकाराच्या कागदावर संगणकीकृत टंकलेखन करून घ्यावे. अर्जासोबत फक्त मूळ पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट जोडावा आणि इतर कोणतीही कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी केली जाईल. अर्ज व्यवस्थित भरून आणि त्यावर नवीन पासपोर्ट साईज फोटो लावून तो एका लिफाफ्यात बंद करावा. लिफाफ्यावर स्पष्ट शब्दांत ‘सफाईगार पदासाठी अर्ज’ असे लिहून तो ‘प्रबंधक, जिल्हा न्यायालय, नगर रोड, बीड – ४३११२२’ या पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टने पाठवावा. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti