Dailyhunt

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरा अर्ज!! - HSC/SSC Supplementary Exam Application Form 2026

SSC Supplementary Exam Application Form 2026

हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि.

१२ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेसाठीची नोंदणी राज्य मंडळाने यापूर्वीच सुरू केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही नोंदणी सुरू केली आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेसाठी
पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारण्यास इच्छुक विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना अर्ज भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे २६ मेपर्यंत विभागीय मंडळाकडे रक्कम भरणे गरजेचे आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट विभागीय मंडळांकडे २९ मेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ अशा तीन लगतच्या संधी उपलब्ध राहतील, नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.


HSC Supplementary Exam Application Form 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मंगळवार (ता. ०५ मे २०२६) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.

राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर केला. राज्य मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये घेणार आहे. त्यासाठी पुनर्परीक्षा, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, जून-जुलैमध्ये नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहणार आहेत. नियमित व विलंब शुल्काने अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याच्या तारखांमध्ये मुदतवाढ देणार नाही. अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच कळविण्यात येतील, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले.
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज करण्यासाठी ५ ते १५ मे पर्यंत आणि विलंब शुल्कासह १६ ते २० मे पर्यंत मुदत दिली आहे. उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना रक्कम भरण्यासाठी २१ मे पर्यंत मुदत आहे. तर शाळा आणि महाविद्यालयांना पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे २५ मे पर्यंत जमा करायची आहे, असेही डॉ. माळी यांनी नमूद केले आहे.


HSC Supplementary Exam Application Form 2025 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बुधवार (दि. ७) ते शनिवार (दि. १७ मे) या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १८ ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे. पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयांनी २३ मे रोजी शुल्काची रक्कम विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे, तर विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट २६ मे रोजी जमा करायची असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परी-क्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती ऑनलाइन अर्जात घेता येईल. श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) उपलब्ध राहतील. नियमित आणि विलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti