Dailyhunt
चौकीदार भरती जाहिरात दुरुस्त करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांचे निर्देश; एसटी उमेदवारांसाठी आता आरक्षण सुनिश्चित  | Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

चौकीदार भरती जाहिरात दुरुस्त करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांचे निर्देश; एसटी उमेदवारांसाठी आता आरक्षण सुनिश्चित | Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

Mahatribal Chowkidar Bharti 2026

नाशिक आयुक्तालयाच्या चौकीदार भरतीत मोठा बदल; एसटी उमेदवारांसाठी आता आरक्षण सुनिश्चित !! आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या चौकीदार भरतीच्या जाहिरातीवरून मोठी चर्चा सुरू झाली होती.

२७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी एकही पद राखीव नसल्याचे समोर आल्यानंतर अनेक स्तरावर नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री Ashok Uike यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना जाहिरात दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !

आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत "चौकीदार" पदांच्या 416 रिक्त जागा - त्वरित ऑनलाईन अर्ज करा !! | Tribal Ashram School Recruitment 2026

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मंत्री डॉ. वुईके यांनी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सचिव आणि आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीदरम्यान २० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींचा सखोल आढावा घेण्यात आला. त्यानुसार भरती प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करून नव्याने दुरुस्त जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले.

मंत्री डॉ. वुईके यांनी स्पष्टपणे सांगितले की, चौकीदार पदांच्या भरतीसाठी लवकरच शुद्धीपत्रक (Corrigendum) जारी करण्यात येईल. यामुळे अनुसूचित जमातीतील उमेदवारांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होणार नाही. याशिवाय, अट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडित कुटुंबीयांच्या वारसदारांना सरकारी सेवेत संधी देण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या सुधारित प्रक्रियेत आदिवासी विकास विभागातील वर्ग-४ मधील एकूण १५१ पदे पुन्हा कार्यान्वित (Revive) करण्यात येणार आहेत. या पदांवर एकदाच विशेष बाब म्हणून भरती केली जाणार असून, त्यामध्ये अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी आवश्यक ते आरक्षण लागू केले जाणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सामाजिक न्याय या दोन्ही बाबींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे एसटी उमेदवारांमध्ये निर्माण झालेली चिंता आता दूर होण्याची शक्यता आहे. सरकारकडून घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक न्याय्य आणि नियमांनुसार पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मंत्री Ashok Uike यांनी उमेदवारांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत जाहिरात आणि सूचना यांवरच विश्वास ठेवावा आणि पुढील अपडेटसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत माध्यमांवर लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

एकूणच, या प्रकरणात सरकारने घेतलेली जलद आणि ठोस भूमिका ही अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी दिलासादायक ठरली आहे. सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून, इच्छुक उमेदवारांना योग्य संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Mahatribal Mega Bharti 2026

आदिवासी विकास विभाग भरतीत आदिवासींनाच ‘नो-एंट्री’ !!आदिवासी विकास विभागाच्या भरतीत आदिवासींना डावलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौकीदार पदाच्या ४१६ जागांसाठी निघालेल्या भरतीत अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नसल्याने सरकारच्या आरक्षण धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या आकृतिबंधामुळे आदिवासी युवकांना थेट बाहेर ठेवण्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सुशिक्षित बेरोजगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी आयुक्त कार्यालयाने शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार पदासाठी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त १०० टक्के पदे भरण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार २९ प्रकल्प कार्यालयात ४१६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी २७ एप्रिल २०२६ ते १८ मे २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ही भरती प्रक्रिया आदिवासी विभागात होत असताना, आदिवासी प्रवर्गातील युवकांनाच त्याचा लाभ होणार नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुशिक्षित आदिवासी बेरोजगारांसाठी ही स्थिती ‘धोक्याची घंटा’ असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. या वादाचा केंद्रबिंदू म्हणजे २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला आरक्षणाच्या बिंदुनामावलीसंदर्भातील शासन निर्णय होय. ✅ !

या नव्या आकृतिबंधानुसार अनुसूचित जमातीला आठव्या क्रमांकावर ढकलण्यात आले आहे. परिणामी, कमी पदसंख्येच्या (छोट्या संवर्गातील) भरतीत एसटी प्रवर्गाला प्रत्यक्षात संधीच नाकारण्यात आली आहे. यापूर्वी २७ मार्च १९९७व २९ मे २०१७ च्या शासन निर्णयांनुसार ४ पदांच्या भरतीत अनुसूचित जमातीला किमान एक पद वर्गाला व्या नावर ग्यात ने पेच असा होता की, पहिले पद अनुसूचित जाती (एससी) व दुसरे पद अनुसूचित जमाती (एसटी) यांना मिळत असे. त्यामुळे कमी पदसंख्येतही आदिवासी उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळत होते. मात्र, २०२२ च्या नव्या निर्णयानुसार पहिले पद एससी, दुसरे विमुक्त जाती (अ) आणि पुढील क्रमवारीत एसटी प्रवर्गाला आठव्या स्थानावर टाकण्यात आल्याने प्रत्यक्षात त्यांचे आरक्षण संपुष्टात आल्याची टीका झाल्या आहे.


शासनाच्या आदिवासी विभागात रिक्तपदांचा डोंगर आहे. चार हजार ४४० तर एकट्या क्लास वन अधिकाऱ्यांची ८० पदे रिक्त आहेत, त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे. ही बाब आदिवासींच्या कल्याणात बाधा आणणारी ठरू पाहत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने रिक्तपदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनने केली आहे. आदिवासी विकास विभागातील रिक्तपदांची आकडेवारी चधितल्यास क्लास वनची ८०, क्लास टूची १८७, तृतीयश्रेणीतील चार हजार ४१ व चतुर्थश्रेणीची १३२ पदे रिक्त आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाच्या विविध संवर्गात रिक्तपदांचा आकडा साडेचार हजारांवर आहे.

ही बाब आदिवासी समाजाच्या विकासाला कोसो दूर ढकलणारी आहे. मान्य पदांच्या तुलनेत निम्मे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात कामावर असल्याने कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी नीट होत नाही. हा अनुशेष उत्तरोत्तर वाढत आहे. आदिवासी समाजाच्या विकासासह कल्याणकारी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी १९७६मध्ये आदिवासी विकास संचालनालयाचे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीनीकरण करण्यात आले. मात्र राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे येथील अनुशेष पूर्ण केला नाही. २५ वर्षांनंतर १९७२मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना केली. त्यानंतर १९७६मध्ये आदिवासी विकास आयुक्तालय सुरू केले. २२ एप्रिल १९८३ला स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची मुहूर्तमेढ रोवली. १९८४ पासून राज्यात आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत होता. १९९२मध्ये आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले. ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व ३० प्रकल्प कार्यालयांमार्फत या विभागाचा कारभार चालतो.

राज्यातील सर्व आदिवासी विकास विभागांतील रिक्त एकूण पदापैकी सर्वाधिक चार हजार ४१ रिक्तपदे ही तृतीयश्रेणीतील आहेत. आश्रमशाळांमध्ये शिक्षकासह शिक्षकेत्तर कर्मचा-यांची अनेक पदे रिक्त असल्याने ही पदे बाह्य संस्थेमार्फत भरण्याची मागणी पुढे आली आहे. शिक्षकेतर पदांबाबतचा प्रश्न अत्यंत जटील झाला आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, आरोग्य, पोषण, रोजगार आदी योजना राबवून आदिवासींची प्रगती साधली जाते. परंतु शासनाकडून पदभरती होत नसेल, तर आदिवासींच्या विकासाचा निर्देशांक कसा गृहीत धरायचा, असा प्रश्न निर्माण होतो.


Mahatribal Bharti 2026 vacancy for Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Men / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant / Cameraman-cum-Projector Operator as well as High Grade Stenographers and Low Grade Stenographers etc. at the Commissioner’s Office level Posts. a Computer Based Test will be conducted at the designated examination center in Maharashtra. Know More details about Mahatribal Bharti

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Recruitment

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
संशोधन सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल-मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
आदिवासी विकास निरिक्षक
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
लघुटंकलेखक
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)
  • समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (स्त्री)
ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यक
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
सहाय्यक ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर वेतन श्रेणी एस-१०
  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
  • सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले
उच्च श्रेणी लघुलेखकशासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.
निम्न श्रेणी लघुलेखकशासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. लघुलेखक (इंग्रजी) निम्न श्रेणी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.

Salary Details For Adivasi Vikas Vibhag Notification

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक38600-122800
संशोधन सहाय्यक38600-122800
उपलेखापाल-मुख्य लिपिक35400-112400
आदिवासी विकास निरिक्षक35400-112400
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक25500-81100
लघुटंकलेखक25500-81100
गृहपाल (पुरुष)38600-122800
गृहपाल (स्त्री)38600-122800
अधिक्षक (पुरुष)25500-81100
अधिक्षक (स्त्री)25500-81100
ग्रंथपाल25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक19900-63200
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)35400-112400
सहाय्यक ग्रंथपाल21700-69100
उच्च श्रेणी लघुलेखक41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक38600-122800

Important Date - Tribal Development Department Bharti

Important EventsDates
Commencement of on-line registration of application12th October 2024
Closure of registration of application30th November 2024

Recruitment of Various Posts

Important EventsDates
Commencement of on-line registration of application
Closure of registration of application
Closure for editing application details
Last date for printing your application
Online Fee Payment

Adivasi Vikas Mahamandal Bharti Details

१) परोक्षेत्ता दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित क्योमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शतीं, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याचाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल,
३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद करणे, अर्शतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील, व त्यांचा निर्णय अंतिम असेल, पात्रावत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल, सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात बाद, तक्रारी, उद्‌भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.

Maha Tribal Development Department Jobs – Important Documents

  • परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
  • अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र

How to Apply For Maha Tribal Development Department Recruitment

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  2. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे :-

  • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादीचे स्कॅन करून ठेवावे.
  • छायाचित्र (४.५ से.मी. x ३.५ से.मी.) १०.१ २ स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
  • स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)
  • इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकुर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)
  • हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील मुद्दा ११:३ मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्विकारली जाणार नाही
  • डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. (उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो)

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti