MSCE Pune Scholarship Final Answer Key 2025-2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या उत्तरसूचीवरील आक्षेप, हरकती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन स्वरूपात करता येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ऑनलाइन निवेदन पालकांसाठी केतस्थळावर आणि शाळांसाठी ऑनलाइन प्रणालीतील शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. १४ मेनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे त्रुटी, आक्षेपांचे निवेदन दिल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. परीक्षेची उत्तरसूची www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइनरीत्या नोंदविता येणार
MSCE Scholarship Answer Key 2026
- या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत निवेदन परिषदेच्या 'www.mscepune.in' आणि 'https://www.mscepuppss.in' या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात करता येणार आहे.
- ऑनलाइन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर आणि शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये 'ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड आन्सर की' या पर्यायात उपलब्ध करून दिली आहे.
- त्यानंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
- ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
- मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
- तसेच मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिषदेने सांगितले आहे.
- शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक…
- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ चे प्रवेशपत्र प्रसिद्ध केलेबाबत…
- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) एप्रिल, २०२६ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अंतिम मुदतवाढ…
- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) २०२६ च्या अधिसूचना प्रसिद्धीबाबत…
- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) सन २०२५-२६ च्या पूर्व तयारीबाबत…
MSCE Pune Scholarship for 4th & 7th Standard Exam Details
| Department Name | Maharashtra State Council of Examination, Pune |
| Scholarship Name | MSCE Pune Pre-Secondary Scholarship Exam class of 5th & & 8th |
| Level of Exam | State Level |
| Type of Scholarship | Pre Upper Primary Scholarship Examination - 5th Class Pre Secondary Scholarship Examination - 8th Class |
| Online Objection Dates | |
| Date of Examination | |
| Answer Key Release Date | |
| Article Category | Answer Key |
| Official Website | www.mscepune.in |

