Monday, 10 Aug, 2.45 pm महा भरती

होम
एम्समध्ये सुमारे ४ हजार जागांवर भरती!

Table of Contents

 • पदांची माहिती
 • कोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त?
 • अर्जाची माहिती
 • अर्जाचे शुल्क
 • निवड प्रक्रिया
 • पात्रता
 • वयोमर्यादा

AIIMS Nursing Officer Recruitment 2020 : एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरच्या जागांसाठी भरती सुरू आहे. नागपूर एम्समध्ये किती जागा.जाणून घ्या..

AIIMS Nursing Officer Recruitment 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील नागपूर एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे.

कोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त आहेत? अर्ज कधीपर्यंत करता येतील? पात्रतेचे निकष काय आहेत? या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या बातमीत मिळेल. सोबत नोटिफिकेशन तसेच अर्ज करण्याची थेट लिंकही देण्यात येत आहे.

पदांची माहिती

 • पदाचे नाव - नर्सिंग ऑफिसर
 • पदांची एकूण संख्या - ३,८०३

कोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त?

 • एम्स नवी दिल्ली - ५९७
 • एम्स भुवनेश्वर - ६००
 • एम्स देवघर - १५०
 • एम्स गोरखपुर - १००
 • एम्स जोधपुर - १७६
 • एम्स कल्याणी - ६००
 • एम्स मंगलागिरी - १४०
 • एम्स नागपूर - १००
 • एम्स पाटणा - २००
 • एम्स रायबरेली - ५९४
 • एम्स रायपूर - २४६
 • एम्स ऋषिकेश - ३००

अर्जाची माहिती

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियी ५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

 • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - १८ ऑगस्ट २०२०
 • अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख - १८ ऑगस्ट २०२०
 • परीक्षेची तारीख - १ सप्टेंबर २०२०

अर्जाचे शुल्क

सर्वसाधारण आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी १५०० रुपये, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएससाठी १२०० रुपये शुल्क आहे. दिव्यांग उमेदवरांसाठी अर्ज नि:शुल्क आहे.

निवड प्रक्रिया

एम्स नर्सिंग ऑफिसर (AIIMS Nursing Officer) पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होईल. या परीक्षेचे नाव नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलीटी टेस्ट (NORCET 2020) असे आहे.

पात्रता

नर्सिंगमध्ये बीएससी किंवा अन्य कोर्स करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे.

वयोमर्यादा

किमान १८ वर्षे तर कमाल ३० वर्षे वयोमर्यादा. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा - https://mahabharti.in/aiims-recruitment-2020/

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti
Top