तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामपातळीवरील नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होतील; तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील, असा दावा करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाचे सहसचिव ज्ञानदेव सूळ यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे महसूल विभागातील महत्त्वाचे पद आहे. तलाठ्यांचा संपर्क थेट जनतेशी असतो. मात्र, अनेक तलाठी रोज कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या व्यस्ततेमुळे तलाठी यांच्यावर प्रभावीपणे पर्यवेक्षण करणे शक्य होत नाही. मनुष्यबळ उपलब्ध असूनही समन्वयाच्या अभावामुळे दैनंदिन कामकाज परिणामकारक होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तलाठी हे आठवड्यातील चार दिवस कार्यालयात उपस्थित राहतील; तसेच एक दिवस मंडल कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करतील. मंडल मुख्यालयाच्या गावाचा बाजार दिवस त्यासाठी निश्चित केला जाणार आहे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक यासारखी १८४ पदे गेल्या काही काळापासून रिक्त आहेत (Pune Talathi Bharti 2026) . जिल्ह्यातील महसूल प्रशासनात एकूण १ हजार ८८१ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये मंडल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी (अव्वल कारकून) महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वाहनचालक तसेच ड वर्गातील शिपाई अशी विविध पदे जिल्हा प्रशासनासह महसूल विभागात कार्यरत आहेत. या कर्मचा-यांवर नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या विविध प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचे काम मंडळ अधिकाऱ्यांसह अव्वल कारकून करतात. मात्र, स्थानिक पातळीवर त्या प्रकरणाचा अहवाल देणे, पंचनामे करणे यांसारखी छोटी वाटणारी पण महत्त्वाची कामे करण्यासाठी तलाठी आवश्यक असतो. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुणे जिल्ह्यात १ हजार ८८१ पैकी सद्यःस्थितीत १ हजार ६९७ पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी सध्या १८४ पदे ही रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कामे करणारी सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यासह शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. त्यांचीच पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ‘पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदांचा सरकारकडून आढावा घेतला जातो. त्यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यामुळे सरकार कधी भरती करेल हे आताच सांगता येणार नाहीं’, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तलाठी भरती २०२६ महत्वाच्या लिंक्स :
Educational Qualification For Pune Talathi Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
Salary Details For Pune Talathi Bharti 2026 Online Form
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| तलाठी | s8 : 25,500 – 81,100 + Others |
How To Apply For Pune Talathi Jobs 2026
- तलाठी भरती 2026 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
- ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Pune Talathi 2026 Recruitment
- तलाठी भरती 2026 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mahabhumi.gov.in |

