Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महत्वाचे!-महाबीजच्या मधील रिक्त पदांचा तपशील जाहीर, नवीन पदभरती प्रक्रिया आता. | MahaBeej Bharti 2026

महत्वाचे!-महाबीजच्या मधील रिक्त पदांचा तपशील जाहीर, नवीन पदभरती प्रक्रिया आता. | MahaBeej Bharti 2026

MahaBeej Bharti 2026

पल्याला माहीतच असेल,महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे पुरवणारी अग्रगण्य संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला आहे.

महाबीजमध्ये नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महामंडळाने दिनांक ०१ मे २०२६ रोजीची सर्व संवर्गातील भरण्यात आलेली पदे आणि रिक्त पदे यांची एकत्रित अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार, महामंडळात सध्या ३५३ पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरील आकडेवारी महामंडळाच्या आस्थापनेवरील अंदाजित तपशिलानुसार असून, संवर्गनिहाय सविस्तर यादी महाबीजच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून महाबीजमधील भरती प्रक्रियेकडे राज्यातील कृषी पदवीधर आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ०१ मे २०२६ च्या या ताज्या अहवालामुळे आता महामंडळात लवकरच Mega भरती किंवा थेट सेवाभरतीची जाहिरात येण्याची शक्यता बळावली आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) अकोला, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता दिली आहे. हा आकृतिबंध अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता 'महाबीज'च्या विद्यमान आकृतिबंधामध्ये सुधारणा करून ५६० नियमित पदे, १०० अधिसंख्य पदे आणि ६३ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निर्णयामुळे महाबीज संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास, प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम होण्यास तसेच बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी 'महाबीज'ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. सुधारित आकृतिबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहारेकरी, लघुलेखक निम्नश्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्याची तरतूद केली आहे.

राज्यातील १३ हजार २७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने १०९ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात लॅपटॉपचा पुरवठा जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहचविण्यात येतील. पुरवठादाराकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक लॅपटॉपची शंभर टक्के गुणवत्ता तपासणी पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ या स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

लॅपटॉपमुळे डिजिटल प्रशासनाला चालना मिळून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कृषी विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाला अधिक गती देण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कृषी प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी फायदा अपेक्षित आहे. क्षेत्रीय कर्मचारी वर्गात लॅपटॉप पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने सन २०२१ पासून तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना २०२३ पासून केलेली आहे. या संघटनांसोबत कृषी आयुक्तालय स्तरावर तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी व मागणी समजावून घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे." अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

यापूर्वी ३० ऑक्टोबर २०१४ रोजी मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात एकूण ७३७ पदे होती. नव्या सुधारित आकृतीबंधात संस्थेच्या सध्याच्या गरजा, तांत्रिक बदल आणि कार्यपद्धतीतील सुधारणा लक्षात घेऊन पदरचनेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. अधिसंख्य पदे रिक्त झाल्यानंतर ती पुन्हा भरण्यात येणार नसून भविष्यात मंजूर नियमित पदांची संख्या ५६० इतकीच राहणार आहे. सुधारित आकृतीबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई,पहरेकरी, लघुलेखक निम्न श्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे.


MahaBeej Akola Bharti 2025

MahaBeej Akola Bharti 2025: The Maharashtra State Seeds Corporation Limited, Akolapublished an advertisement for the various vacancies. The name of the post is "Law Officer". There is a 01 vacant post available. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can apply before the 01st November 2025. For more details about MahaBeej Akola Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, अकोला अंतर्गत "कायदा अधिकारी" पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव - कायदा अधिकारी
  • पदसंख्या - 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण - अकोला
  • वयोमर्यादा - 35 वर्षे आणि कमाल 50 वर्षे.
  • अर्ज पद्धती - ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता - महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला (एमएस) ४४४ १०४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट - https://www.mahabeej.com/

MahaBeej Akola Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
कायदा अधिकारी01

Educational Qualification For Maharashtra State Seeds Corporation Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कायदा अधिकारीDegree in Law from recognized University having Sanad/Registration with Bar Council.. He/She must have minimum 5 years experience as a Practicing Advocate. Experience in the field of Civil, Labour, Revenue, Consumer Forums and Administrative matters as well as matters relating to Departmental Enquiries. Knowledge of Marathi, Hindi and English is essential.

Salary Details For MahaBeej Akola Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
कायदा अधिकारीRs.45,000/-

How To Apply For MahaBeej Akola Application 2025

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ईमेलद्वारे प्राप्त झालेला कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाइट www.mahabeej.com वर नोकरीच्या यादीत उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात संबंधित प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित झेरॉक्स प्रतींसह अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2025आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahabeej.com Bharti 2025

PDF जाहिरात
https://shorturl.at/lqxY9
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahabeej.com/
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti