Dailyhunt

महाऊर्जा परीक्षेचा निकाल, निवड, प्रतीक्षा याद्या जाहिर - MEDA Maha Urja Result

MEDA Maha Urja Result - Advertisement No. 01/2025, dated 29/10/2025, was published for the purpose of filling-via direct recruitment-18 posts in the Project Executive Officer cadre, 22 posts in the Project Officer cadre, and 02 vacant posts in the Accountant cadre within the establishment of the MahaUrja office.

In pursuance of the said advertisement, and based on the online examination conducted by M/s IBPS on 12/02/2026 and 13/02/2026, the Select List, Wait List, and Consolidated Merit List received from M/s IBPS are hereby being published on the MahaUrja website at www.mahaurja.maharashtra.gov.in under MEDA Maha Urja Result .

महाऊर्जा कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रकल्प कार्यकारी अधिकारी संवर्गाची १८ पदे, प्रकल्प अधिकारी संवर्गाची २२ पदे व लेखापाल संवर्गाची ०२ रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता, सरळसेवा जाहिरात क्रमांक ०१/२०२५ दिनांक २९/१०/२०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक १२/०२/२०२६ व दिनांक १३/०२/२०२६ रोजी मे.आय.बी.पी.एस. या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने, मे.आय.बी.पी.एस. संस्थेकडून प्राप्त झालेली निवड यादी (Select List), प्रतिक्षा यादी (Wait List) व एकत्रित गुणांकन यादी महाऊर्जा संकेतस्थळावर www.mahaurja.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पदाकरीता अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातील राखीव रिक्त जागेवर किमान गुण (९० गुण) धारण करणारा उमेदवार उपलब्ध झालेला नाही. महाऊर्जा आस्थापनेवरील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी व लेखापाल पदांच्या भरती प्रक्रिये संदर्भात महाऊर्जाकडून देण्यात येणाऱ्या सविस्तर सूचना व माहिती करीता उमेदवारांनी महाऊर्जा संकेतस्थळास वेळोवेळी भेट द्यावी.

  • निकाल सूचना
  • भरती-फसवणूक-सूचना
  • प्रकल्प अधिकारी – निवड यादी
  • प्रकल्प अधिकारी – प्रतीक्षा यादी
  • प्रकल्प अधिकारी – परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांची एकत्रित गुणांकन यादी
  • प्रकल्प कार्यकारी अधिकारी – निवड यादी
  • प्रकल्प कार्यकारी अधिकारी – प्रतीक्षा यादी
  • प्रकल्प कार्यकारी अधिकारी – परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांची एकत्रित गुणांकन यादी
  • लेखापाल – निवड यादी
  • लेखापाल – प्रतीक्षा यादी
  • लेखापाल – परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांची एकत्रित गुणांकन यादी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti