Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेशनोंदणीस मुदतवाढ!! - MahaCET Admission 2026 - 2027

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेशनोंदणीस मुदतवाढ!! - MahaCET Admission 2026 - 2027

MahaCET Registration Update

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) व अॅग्रीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम-पीसीबी समूह, बी. डिझाईन, नर्सिंग, वैद्यकीय डीपीएन, पीएचएन, पदवी शिक्षण (बी. एड), पदव्युत्तर शिक्षण (एमएड), पदव्युत्तर शारीरिक शिक्षण (एमपीएड) या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत १७ अभ्यासक्रमाच्या सीईटीला १२ लाख २८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेशनोंदणी केली असून, दोन संधी मिळून १६ लाख ५८ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेशनोंदणीची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ होती. विलंब शुल्कासह अंतिम मुदतवाढ २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. बी.एस्सी. नर्सिंग व डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची मुदतवाढ २५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२६ पर्यंत करण्यात येत आहे. बी. डिझाईन या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेशनोंदणीची अंतिम मुदतवाढ २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येत आहे, तर बी.एड्., एम.एड् व एमपी.एड्. या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची मुदतवाढ २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येत आहे.
प्रवेशनोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणी मागील वर्षापेक्षा जास्त झाली असून, २०२५च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आजपर्यंत ही नोंदणी ४ लाख ६६ हजार ७७९ झाली असून, ही वाढ २ हजार ५१७ ने जास्त आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www. mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील. उमेदवारांनी अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.


MahaCET Registration Update

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) अर्जनोंदणी प्रक्रियेत उमेदवाराच्या आधार कार्ड, अपार आयडी तसेच दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेतील नावांमध्ये तफावत असली तरी कोणताही अडसर राहणार नाही. नाव, जन्मतारीख किंवा अन्य वैयक्तिक तपशिलांतील फरकामुळे कोणताही अर्ज अपात्र, नामंजूर किंवा बाद केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी
विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला आहे.

सीईटी कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी अर्जनोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी आणि शैक्षणिक कागदपत्रांवरील नावातील तफावतीमुळे अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन सीईटी कक्षाने ऑनलाइन अर्ज प्रणालीत नाव भरण्यासाठी तीन स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आधारप्रमाणे आपोआप नाव भरण्याची सुविधा, आधारप्रमाणे उमेदवाराने स्वतः नाव नोंदवण्याचा पर्याय तसेच बारावीच्या प्रमाणपत्राप्रमाणे नाव भरण्याची सुविधा समाविष्ट आहे. याशिवाय उमेदवारांना जन्मतारीख व इतर वैयक्तिक तपशील वैध पुराव्यांनुसार हाताने भरण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही वैध दस्तऐवजांच्या आधारे उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. नाव किंवा वैयक्तिक तपशिलांमधील तफावतीमुळे उमेदवाराच्या पात्रतेवर परिणाम होणार नाही. अशा कारणांवरून कोणताही अर्ज बाद केला जाणार नाही. सर्व उमेदवारांना कोणत्याही अडथळ्याविना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील टप्प्यात करता येणार दुरुस्ती
अर्ज नोंदणीदरम्यान अनवधानाने चुकीचे नाव किंवा माहिती भरली गेली तरी त्याचा अर्ज प्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आवश्यकतेनुसार कॅप फेरीदरम्यान निर्धारित कार्यपद्धतीनुसार अशा तफावती दुरुस्त करता येतील. त्यामुळे विद्याथ्यांनी घाबरून न जाता वैध पुराव्यांच्या आधारे अर्ज भरावा. तांत्रिक अडचणींसाठी सीईटी कक्षाच्या पोर्टलवरील अधिकृत मदत केंद्र किंवा हेल्पडेस्कशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.


MahaCET Registration Update

शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात एमपीएड आणि एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या दोन अभ्यासक्रमांच्या नोंदणीद्वारेच २०२६ सालच्या सीईटी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे.

एमपीएड व एमएड अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाइन नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२६ आहे. या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेण्यात येणार असून, परीक्षा २४ व २५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रिया व परीक्षेबाबतची सविस्तर आणि अधिकृत माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील वर्षी या दोन प्रवेश परीक्षांसाठी एकूण ६,१९३ उमेदवारांनी नोंदणी केली होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांची अचूक माहिती मिळावी आणि पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी यंदापासून सीईटी नोंदणी करताना 'अपार आयडी' अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 'युनिक डिसॅबिलिटी आयडी' देणे बंधनकारक असेल. नोंदणीदरम्यान संबंधित आयडीची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजिलॉकरच्या माध्यमातून तयार करावा, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक व इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.


MahaCET Admission 2026-27

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून, त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण व कला शिक्षण या सहा विभागांतर्गत एकूण २० विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा व ७३ अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. व हे प्रवेश ५७०० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थामधून दिले जातात. प्रवेश देण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येते.

आगामी शैक्षणिक वर्षात बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये यंदापासून इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी, तसेच एमबीए /एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. त्यांचे नियोजन सीईटी सेलने सुरू केले असून, त्याचे संभावित वेळापत्रक जाहीर केले आहे.
याबरोबरच सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
सीईटी परीक्षा वेळेत होऊन प्रवेश प्रक्रियाही वेळेवर पार पाडण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे. त्यानुसार आता १ जानेवारी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने सीईटी सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आयुक्त सरदेसाई यांनी दिली.

असे आहे वेळापत्रक

इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटीची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा १४ मे ते १७ मेदरम्यान होणार आहे.

एमबीए / एमएमएस परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ९ मे रोजी घेण्यात येणार आहे.

कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी पहिली प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान तर दुसरी प्रवेश परीक्षा १० मे व ११ मे रोजी घेतली जाणार आहे.


MahaCET Admission 2026-27

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात येत्या आठवडाभरात करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून, त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार असल्याचे सीईटीसेलमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सीईटी सेलने यंदा बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये यंदापासून इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी, तसेच एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. त्यांचे नियोजन सीईटी सेलने सुरू केले असून, त्याचे संभावित वेळापत्रक जाहीर केले आहे.
सीईटी परीक्षा वेळेत होऊन प्रवेश प्रक्रियाही वेळेवर पार पाडण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे. त्यानुसार आता
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने सीईटी सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सीईटी सेलमार्फत यंदा २४ मार्चपासून सामायिक प्रवेश परीक्षांना सुरुवात केली जाणार आहे. सध्या एकूण १७ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या १२ प्रवेश परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५ प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. यातील बहुतांश प्रवेश परीक्षा सकाळी व दुपारच्या सत्रात ऑनलाइन घेतल्या जातील. तर काही प्रवेश परीक्षा सायंकाळच्या सत्रात देखील होतील.

असे आहे वेळापत्रक
सीईटी सेल यंदा एमबीए / एमएमएस परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ९ मे रोजी घेणार आहे.
इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटीची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा १४ मे ते १७मेदरम्यान घेतली जाणार आहे.
कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी पहिली प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान तर दुसरी प्रवेश परीक्षा १० मे व ११ मे रोजी घेतली जाणार आहे.


MahaCET Admission 2024-25

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मंगळवारी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे पुढील वेळापत्रक जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी १४ ऑगस्टला जाहीर होणार आहे तर अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) पदवी प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने मंगळवारी प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी यंदा १ लाख ९२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची ८ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या असून त्यातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तर शेवटची फेरी संस्थास्तरावर होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अंतिम गुणवत्ता यादी : ८ ऑगस्ट

पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम : ९ ते ११ ऑगस्ट

पहिली प्रवेशाची यादी : १४ ऑगस्ट

प्रवेश निश्चित करणे : १६ ते १८ ऑगस्ट

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : १९ ऑगस्ट

दुसरी यादी पसंतीक्रम : २० ते २२ ऑगस्ट

दुसरी गुणवत्ता यादी : २६ ऑगस्ट

दुसरी यादी प्रवेश कालावधी : २७ ते २९ ऑगस्ट

रिक्त जागांचा तपशील : ३० ऑगस्ट

तिसरी यादीसाठी पसंतीक्रम : ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर

तिसरी गुणवत्ता यादी : ५ सप्टेंबर

तिसरी यादी प्रवेश कालावधी : ६ ते ९ सप्टेंबर

संस्थास्तर पद्धतीने : १० ते १३ सप्टेंबर


MHT CET Admission Schedule: राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. या अतिरिक्त सीईटीसाठी विद्यार्थ्यांना शनिवार, २९ जून ते बुधवार, ३ जुलै या कालावधीत https:// cetcell. mahacet. org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदणी व निश्चिती करता येणार आहे.

तसेच, या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २९ मे रोजी परीक्षा दिली आहे. अशा विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त सीईटी देण्यात येणार आहे, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे दोन्ही परीक्षांपैकी सर्वोत्तम असणारे पर्सेन्टाइल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिये वेळी विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम पर्सेन्टाइलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक असेल. अतिरिक्त सीईटीची निकाल प्रक्रियासुद्धा पर्सेन्टाइल पद्धतीने करण्यात येणार आहे. अतिरिक्त सीईटी ही महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. तसेच, परीक्षेची तारीख निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. अतिरिक्त सीईटीची तारीख तात्काळ जाहीर करावी, अन्यथा रिक्त जागांवर विद्यापीठ व महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा करावा. याबाबत सीईटी कक्षाच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली, असे मनसेचे सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.


CET Admission Process 2024

MHT CET Admission Schedule: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) च्या वतीने आतापर्यंत ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे बहुतांश अभ्यासक्रमांचे प्रवेश हे जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याचे संकेत आहेत. यावर्षी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना वारंवार नोंदणी करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी एकदा नोंदणी केल्यावर त्याच लॉगिनमधून त्यांना सीईटी परीक्षांबरोबरच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. यामुळे नोंदणीचे काम विद्यार्थ्यांचे सोपे होणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया

प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्या समन्वयातून १६हून अधिक प्रवेश परीक्षांद्वारे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कृषी, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण या संचालनालयांकडून प्रवेश प्रक्रियेचे नियोजन तयार करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते. यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलला परीक्षांचे वेळापत्रक वारंवार बदलावे लागले. नियोजन केल्याप्रमाणे अगोदरच झालेल्या एमसीए, एलएलबी तीन वर्ष, एमसीटी, आर्कीटेक्चर, बीएड, एमपीएड, बीपीएड अशा ९ अभ्यासक्रमांच्या सीईटी घेवून या परीक्षांचे निकालही जाहीर केले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांचेही प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.

पुन्हा स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागणार नाही

दरम्यान, यावर्षी सीईटी सेलने प्रवेश पूर्व नोंदणीत बदल केले आहेत. अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय या अभ्यासक्रमांबरोबरच अन्य विधी, बीएड अशा व्यावसायिक शाखांच्या पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागते. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. त्यानंतर या परीक्षांच्या निकालानंतर या गुणांवर पुढील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जाते. यावेळी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागत होती. विद्यार्थ्यांना आपली माहिती अनेकदा भरावी लागत होती. यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर त्यांना प्रवेशावेळी पुन्हा नोंदणीची गरज असणार नाही. तसेच प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना यापूर्वी भरलेली माहिती पुन्हा नव्याने सादर करावी लागणार नसल्याचे यापूर्वीच सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सोपी असणार आहे. वारंवार नोंदणी करावी लागणार नाही. त्यामुळे प्रवेशाचा काळ कमी होवून झटपट प्रवेश प्रक्रिया सर्वच अभ्यासक्रमांची करण्याबाबत सीईटी सेलकडून हालचाली आहेत.


MAHACET Admission 2024 @ cetcell.mahacet.org

MAHA CET Admission Schedule : MahaCET Admission process for various coerces is started now. The Admission schedule is published by MahaCET Department on official website cetcell.mahacet.org. :-

महाराष्ट्र CET सेलने सामायिक प्रवेश परीक्षेचे (CET) एप्रिलमधील वेळापत्रक मेपर्यंत पुढे ढकलल्यामुळे एकाच दिवशी नीट व सीईटी परीक्षा आली होती. सीईटी सेलने ५ मे रोजी होणारी सीईटीची परीक्षा रद्द केली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे सीईटीच्या एप्रिलमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीईटी सेलने वेळापत्रक पुढे ढकलताना ‘नीट’च्या वेळापत्रकाचा विचार केला नव्हता. नीटची परीक्षा ५ मे रोजी आहे आणि नेमकी त्याच दिवशी काही विद्यार्थ्यांची पीसीएम विषयाची सीईटी ठेवण्यात आली होती. याबाबत हजारो पालकांनी महाराष्ट्राच्या सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या होत्या. तारखांचा हा गोंधळ लक्षात आल्यानंतर सीईटी सेलने ५ मे रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नव्या तारखेची प्रतीक्षा (MH CET 2024 New Exam Date 2024)

सीईटी सेलने २४ मार्च रोजी सायंकाळी नीट परीक्षेदिवशी येणारी सीईटी परीक्षा रद्द केली असून, सुधारित तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या तारखेची प्रतीक्षा आहे.

वेगळा पायंडा का? – दरवर्षी नीट’च्या परीक्षेनंतरच सीईटी घेतली जात होती. त्यामुळे नीटच्या तयारीला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत होता. नीटपूर्वी सीईटी घेण्याचा नवा पायंडा या वर्षीपासून पाडण्यात आला आहे. त्यामुळे “सीईटी-पीसीबी’ व ‘सीईटी-पीसीएम’च्या विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेलच्या वतीने विधि, एमबीए, बीएड, बीपीएड, एमआर्च, बी डिझाइन आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना येत्या दि. १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांकरिता उमेदवारांच्या नोंदणी डेटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले, अर्ज भरण्यास विलंब झाल्यामुळे मुदतवाढ मिळावी, यासाठी अनेक उमेदवार व पालकांनी सीईटी कार्यालयास विनंती केली होती. उमेदवारांच्या हिताचा विचार करून सीईटी सेलच्या वतीने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांकरीता उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरु झालेल्या व सुरु होणाऱ्या वेळापत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

पूर्ण माहिती बघा


अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र या पूर्वी राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र नियोजित वेळेत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया शनिवारी सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.


Previous Details about MHT CET Admission Schedule

MHT CET Admission Schedule : The admission process for vocational degree courses under the Department of Higher Education has started and a detailed schedule has been published. Candidates seeking admission to these courses will be able to view the schedule by visiting the official website. Higher and Technical Education Minister Uday Samant tweeted about it. Further details are as follows:-

MHT CET Admission Schedule For Vocational Degree Courses Announced

उच्च शिक्षण विभागाअंतर्गत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून याचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहता येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली.

आता महा सीईटीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड ४ वर्षे अभ्यासक्रम, विधी ५ वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम, बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या तीन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अभ्यासक्रमानिहाय वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर https://mahacet.org उपलब्ध आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची थेट लिंक देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti