Jilhadhikari Karyalay Solapur Result
Jilhadhikari Karyalay Solapur Result: आस्थापना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत गट-क अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतिक्षासूची-2026 प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गट-क अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतिक्षासूची-2026
Jilhadhikari Karyalay Solapur Result Update
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाने 17 जुलै 2025 रोजी अनुकंपा नियुक्तीसाठी सर्वसमावेशक सुधारित धोरण जारी केले आहे. या धोरणानुसार संबंधित प्राधिकाऱ्यांनी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत चालू वर्षातील अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी, असे परिपत्रकाद्वारे आदेश देण्यात आले आहेत.
शासन निर्णयात स्पष्ट केले आहे की, गट-क पदांसाठी प्रतिक्षासूची फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवली जाईल. कार्यालय प्रमुखाने उमेदवार गट-कच्या नियुक्तीस पात्र असल्याचे निश्चित केल्यास, त्याचे नाव प्रतिक्षासूचीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा, अशी पद्धत ठरवण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील विविध राज्य शासकीय कार्यालय प्रमुख आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीच्या आधारे, शासन निर्णयातील परिशिष्ट-इ नुसार अनुकंपा प्रतिक्षासूची आणि परिशिष्ट-फ नुसार नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची माहिती तयार करण्यात आली आहे. अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार सोलापूर जिल्हयातील गट-क संवर्गातील उमेदवारांची प्रतिक्षासूची व अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची संख्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Waiting list for compassionate appointment
Information on vacancies available for compassionate appointment
