Saturday, 28 Mar, 4.36 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
१०० कसोटी खेळलेले परंतु १०० वनडेही खेळायला न मिळालेले ५ खेळाडू

२००५ या वर्षी क्रिकेट विश्वात पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला. त्यापुर्वी क्रिकेटमध्ये केवळ कसोटी व वनडे असे दोन प्रकारचे क्रिकेट खेळले जात असे. १८८७ सालात पहिला कसोटी तर १९७१ साली पहिला वनडे सामना झाला.

१९७१ पर्यंत खेळलेल्या क्रिकेटपटूंना कधीही वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यानंतर क्रिकेटर या दोन्ही प्रकारांना जुळवुन घ्यायला लागले व दोन्ही प्रकारात सामने खेळू लागले.

तरीही अनेक क्रिकेटपटूंना या दोनही प्रकारात अनेक खेळाडूंना चांगला समतोल राखता आला तर अनेक खेळाडू कोणत्यातरी एकाच खेळापुरते मर्यादीत राहिले.

जागतिक क्रिकेटमध्ये ६७ खेळाडू हे १०० कसोटी सामने खेळले आहेत परंतु यातील ८ खेळाडूंना १०० किंवा अधिक वनडे सामने खेळायला मिळाले नाहीत.

या लेखात १०० किंवा अधिक कसोटी सामने खेळलेले परंतु वनडेत १०० सामन्यात संधी न मिळालेल्या खेळाडूंवर बोलणार आहोत.

८. सर एलस्टर कूक

जगातील एका टाॅप कसोटी फलंदाजांपैकी एक असलेला इंग्लंडचा एलस्टर कूक तब्बल १६१ कसोटी सामने खेळला आहे. त्याने आपली कारकिर्दच टी२० क्रिकेटच्या जमान्यात सुरु केली. मार्च २००६मध्ये नागपुर कसोटीत या खेळाडूने कसोटीत तर जून २००६मध्ये मॅंचेस्टर वनडेने कारकिर्दीची सुरुवात केली. वनडेत ३६.४०ची ठिकठाक सरासरी व ७७.१३चा स्ट्राईक रेट असलेल्या या खेळाडूला केवळ ९२ वनडे सामने खेळता आले. त्याने शेवटचा वनडे सामना कोलंबोला श्रीलंकेविरुद्ध २०१४साली खेळला.

७. सर क्लाईव्ह लाॅईड

वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लाॅईड हे कारकिर्दीत ११० कसोटी सामने खेळले. त्यांनी १९६६ ते १९८५ या काळात कसोटी कारकिर्द घडवली. त्यांनी वनडे पदार्पण हे ५ सप्टेंबर १९७३साली केले. १९७५ व १९७९ असे दोन विश्वचषक त्यांच्याच नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडिज जिंकली तर १९८३ मध्ये त्यांना भारताविरुद्ध विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलग तीन विश्वचषक फायनलमध्ये त्यांनी संघाच्या कर्णधारपदाची धुरा वाहिली. परंतु त्यांनाही १०० वनडे सामने खेळता आले नाहीत. ते एकूण ८७ वनडे सामने खेळले परंतु ते जेव्हा निवृत्त झाले तेव्हा विंडीजसंघही जेमतेच १०१ वनडे सामने खेळला होता. त्यामुळे विश्वचषकातील या सर्वात यशस्वी कर्णधारालाही १०० वनडे सामने खेळता आले नाहीत.

६. व्हिव्हीएस लक्ष्मण

भारतीय संघातील फॅब ४मधील एक महत्त्वाच नाव अर्थातच व्हिव्हिएस लक्ष्मण. १९९६ ते २०१२ या काळात लक्ष्मणने १३४ कसोटी सामने खेळले. परंतु त्यालाही कधी १०० वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने वनडे कारकिर्दीत जेमतेम ८६ वनडे सामने खेळले ज्यात त्याने ३०च्या सरासरीने व ७१.२३च्या स्ट्राईक रेटने २३३८ धावा केल्या. यातही त्याने ६ शतके व १० अर्धशतके केली. परंतु शेवटपर्यंत लक्ष्मण भारतीय संघव्यवस्थापनाचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरला. त्याच्याकडे कायमच एक कसोटीपटू म्हणून पाहिले गेले. २०१२ पर्यंत कसोटी खेळत असलेला लक्ष्मण शेवटचा वनडे सामना २००६ साली खेळला. शिवाय त्याला कधीही विश्वचषक संघाचे भागही होता आले नाही.

५. ग्रॅहम थोर्प

इंग्लंडचे अनेक महान कसोटीपटू हे १०० कसोटी खेळले आहेत परंतु त्यांना त्या प्रमाणात कधी वनडे क्रिकेट खेळता आले नाही. अनेक क्रिकेट तज्ञ गमतीने म्हणायचे की इंग्लंडचे दोन क्रिकेट संघ आहे एक कसोटीत खेळतात तर एक वनडेत. अशाच या देशातील ग्रॅहम थोर्प. त्यांनी १९९३ ते २००५ या काळात बरोबर १०० कसोटी सामने खेळले. परंतु त्या मानाने त्यांना वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. ते केवळ ८२ वनडे सामने खेळू शकले.

४. माईक आथर्टन

इंग्लंड संघाचा कर्णधार राहिलेल्या अथरटनने १९८९ ते २००१ या १२ वर्षात आपली क्रिकेट कारकिर्द घडवली. तो ज्या संघाकडून खेळला मुळात तो संघच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ११५ कसोटी सामने खेळले परंतु त्याची वनडे कारकिर्द जेमतेम ८ वर्षांची राहिली. यात त्याने केवळ ५४ वनडे सामने खेळले. त्याचा वनडेचा स्ट्राईक रेट हा ५८.६४ हा बऱ्यापैकी खराब राहिला. दुसऱ्या बाजूला १०० किंवा अधिक कसोटी खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये संथ गतीने धावा करण्यात माईक आथर्टन हा तिसरा येतो. तो एकप्रकारे या झटपट क्रिकेट प्रकाराशी कधीच जुळवून घेऊ शकला नाही.

३. जेफ बाॅयकाॅट

इंग्लंडचे माजी महान कसोटीपटू जेफ बाॅयकाॅट हे १९६४ ते १९८२ या काळात क्रिकेट खेळले. कसोटी कारकिर्दीत त्यांनी १०८ कसोटी सामने खेळले परंतु त्यांना जेमतेम ३६ वनडे सामने खेळता आले. ते जेव्हा क्रिकेटमधून निवृत्त झाले तेव्हा इंग्लंड संघच जेमतेम ६६ वनडे सामने खेळला होता. त्यामुळे त्यांना १०० सामने खेळण्याची संधी मिळण्याचा प्रश्नच नव्हता.

२. जस्टिन लॅंगर

ऑस्ट्रेलियाचे महान कसोटीपटू व सध्याचे संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी १९९३ ते २००७ या काळात कसोटी कारकिर्द घडवली. यात त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून १०५ कसोटी सामने खेळले. परंतु त्यांना केवळ ८ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. ते ज्या काळात कसोटी क्रिकेट खेळले त्या काळात ऑस्ट्रेलियाने १९९९, २००३ व २००७ असे तीन विश्वचषक जिंकले.

१. काॅलिन कावड्रे

काॅलिन कावड्रे हे क्रिकेटमधून १३ फेब्रुवारी १९७५ रोजी निवृत्त झाले. त्यावेळी क्रिकेट जगतात १०० कसोटी सामने खेळणारे जगातील पहिले व एकमेव खेळाडू होते. शिवाय ते जेव्हा क्रिकेटमधून निवृत्त झाले तेव्हा इंग्लंड संघ १३ वनडे सामने खेळला होता. यातील केवळ १ सामना त्यांना खेळण्याची संधी मिळाली. त्या एक सामन्यात त्यांनी ५ चेंडूत एकच धाव केली.

वाचनीय लेख

-५ असे खेळाडू ज्यांच्या नावावर आहेत ५ विचित्र विक्रम

-वनडेत सर्वाधिक वेळा धावबाद होणारे ५ खेळाडू, एक नाव आहे भारतीय

-सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू

-५ असे क्रिकेटर जे अंडर १९ खेळले एका देशाकडून आणि क्रिकेट खेळले दुसऱ्या देशाकडून

-जगातील सर्वात उंच ५ क्रिकेटपटू, पहिल्या क्रमांकावरील क्रिकेटपटू उंची ऐकून व्हाल अवाक्

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top