Friday, 13 Dec, 6.06 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
२०२० आयपीएल लिलावासाठी अंतिम खेळाडूंची निवड जाहीर

आयपीएल 2020 चा खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील आता लिलावासाठी अंतिम 332 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात 186 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

अंतिम निवड झालेल्या 332 खेळाडूंपैकी 7 खेळाडूंच्या लिलावासाठी सर्वोच्च 2 कोटी ही मूळ किंमत ठेवण्यात आली आहे. हे सातही खेळाडू विदेशी आहेत. यात ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेल स्टेन, मिशेल मार्श, जोश हेजलवुड, अँजेलो मॅथ्यूज आणि ख्रिस लिन यांचा समावेश आहे.

भारतीयांमध्ये रॉबिन उथप्पाला सर्वाधिक 1.5 कोटी रुपये ही मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. त्याच्यासह अजून 9 विदेशी खेळाडूंचीही हीच मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. तर 23 खेळाडूंची 1 कोटी या मुळ किंमतीसाठी निवड झाली आहे. यात पियूष चावला, युसुफ पठाण आणि जयदेव उनाडकट या तीन भारतीयांचा समावेश आहे.

तसेच 75 लाख या मुळ किंमतीसाठी 16 विदेशी खेळाडूंची निवड झाली आहे. तर 50 लाख या मुळ किंमतीसाठी 78 खेळाडूंची निवड झाली आहे. यात 9 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच अनकॅप खेळाडूंमध्ये (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न खेळलेले खेळाडू) 40 लाख ही सर्वोच्च मुळ किंमत असून यामध्ये 7 खेळाडूंची निवड झाली आहे. तर 30 लाख मुळ किंमतीच्या यादीत 8 खेळाडूंचा समावेश असून 20 लाख मुळ किंमतीच्या यादीत 183 खेळाडू आहेत.

लिलावावेळी प्रथम फलंदाजांची बोली लावतील. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू, यष्टीरक्षक फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीपटू असतील. यानंतर प्रथम कॅप(आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेले खेळाडू) आणि नंतर अनकॅप नसलेल्या खेळाडूंचा लिलाव होईल. एकूणच, 73 खेळाडूच्या रिक्त आहेत. यापैकी 29 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top