Saturday, 28 Mar, 5.40 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
५ महान क्रिकेटर जे खेळू शकले नाहीत १०० कसोटी सामने

क्रिकेटमध्ये वनडे व कसोटी अशा दोनही क्रिकेटला तेवढेच महत्त्व दिले जाते. कसोटी क्रिकेट हे खेळाडूंचा कसं पाहणारे असते तर वनडे हे लोकप्रिय क्रिकेट ओळखले जाते.

क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटर आहेत जे ३००पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत परंतु त्यांना १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळता आले नाही.

वनडे क्रिकेटमध्ये ४ खेळाडू हे ४०० किंवा अधिक सामने खेळले तर एकूण २१ खेळाडू ३०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. परंतु यातील ६ क्रिकेटपटू असे आहेत ज्यांना १०० कसोटी सामने कारकिर्दीत खेळण्याची संधी मिळाली नाही. (5 ODI Legends who had a less successful career in Test Cricket.)

१०० कसोटी सामने खेळू न शकणारे ६ महान वनडेपटू-

६. मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय संघाचा महान माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने १९८५ ते २००० या १५ वर्षांच्या काळात आपली कारकिर्द सजवली. अझर हा भारताच्या यशस्वी वनडे कर्णधारांपैकी एक. त्याने वनडेत भारताकडून ३३४ सामने खेळले. त्याचप्रमाणात त्याला कसोटी सामनेही खेळायला मिळाले. वयाच्या ३७ पर्यंत तो क्रिकेट खेळत होता. परंतु मॅच फिक्सिंगचा आरोप लागला व अझरचा एक विक्रम अगदी थोडक्यात हुकला. भारताकडून कसोटीत १०० सामने खेळणारा गावसकर, वेंगसरकर व कपिलनंतरचा चौथा खेळाडू होण्याची त्याची संधी हुकली. तो कारकिर्दीत ९९ कसोटी सामनेच खेळू शकला.

५. अरविंद डिसिल्वा

श्रीलंकेचा माजी कर्णधार राहिलेला डिसिल्वा ३०८ वनडे सामने खेळला. त्याने १९८४ ते २००२ या काळात चांगले क्रिकेट खेळले. या काळात श्रीलंका संघ एकूण ११५ कसोटी सामने खेळला. परंतु डिसिल्वा यातील ९३ सामन्यांतच भाग घेऊ शकला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात व शेवट वनडे सामन्यांनीच केला. १९९६ विश्वचषकात त्याने अंतिम सामन्यात शतकी खेळी केली होती. जरी त्या वनडेंच्या प्रमाणात डिसिल्वाला कसोटी सामने खेळता आले नसले तरी त्यावर वनडे खेळाडूचा शिक्का कधीच बसला नाही.

४. एमएस धोनी

भारतीय संघाचा वनडेतील सर्वात यशस्वी कर्णधार असलेला धोनी कारकिर्दीत एकूण ३५० वनडे सामने खेळला. त्यात त्याने एक विश्वचषक भारताला जिंकून देताना संघाचे नेतृत्त्वही केली. भारतीय संघाला कसोटीत अव्वल स्थानी नेण्याचा पराक्रम तो कर्णधार असतानाच झाला आहे. असे असले तरी धोनीने ९० कसोटी सामन्यातच आपल्या कसोटी कारकिर्दीचा अलविदा केला. मेलबर्नला तो शेवटचा कसोटी सामना २०१४मध्ये खेळला. तेव्हा त्याने अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीला १०० कसोटी सामने खेळण्याची मोठी संधी होती. परंतु त्यानेच कसोटी कारकिर्द पुढे वाढविली नाही. धोनीची वनडे कारकिर्द १६ वर्षांची असून कसोटी कारकिर्द १० वर्षांची राहिली.

३. तिलकरत्ने दिलशान

तिलकरत्ने दिलशान हा असा एक क्रिकेटपटू आहे जो श्रीलंकेकडून अतिशय उच्च दर्जाचे क्रिकेट खेळला परंतु जयसुर्या, जयवर्धने, संगकारा,मुरलीधरन किंवा चामिंडा वास या नावात त्याचे नाव कुठेतरी हरवुन गेले. ३३० वनडे सामन्यात १०२९० धावा करणाऱ्या दिलशानने कसोटीत ८७ सामने खेळले. त्याची वनडे कारकिर्द १७ वर्षांची राहिली तर कसोटी कारकिर्द ही १४ वर्षांची. जर वनडेप्रमाणेच कसोटीतही संधी मिळत गेली असती तर तो नक्कीच १०० कसोटी सामने खेळू शकला असता.

२. युवराज सिंग

एक आदर्शवत वनडे कारकिर्द असलेला खेळाडू कसोटी क्रिकेट स्थिरावु न शकण्याचं जगातील सर्वात वाईट उदाहरण म्हणजे युवराज सिंग. ३०४ वनडे सामने खेळताना २०११ विश्वचषकात मालिकावीर ठरलेल्या युवराजची कहानीही व्हिव्हीएस लक्ष्मणसारखीच राहिली. त्याला वनडे खेळता आले नाही तर युवराजला कसोटी खेळता आल्या नाहीत. युवराजने जेवढ्या जोरात वनडेत कमबॅक केलं होतं तसेच कमबॅक तो कसोटीतही अनेक वेळा करत होता. परंतु त्याला या प्रकारात कधी स्थिरावताच आले नाही. १७ वर्ष वनडे क्रिकेट खेळलेला युवराज केवळ ९ वर्ष कसोटी संघाचा सदस्य राहिला तेही आत-बाहेर करतच. या ९ वर्षात त्याने केवळ ४० कसोटी सामने खेळले.

१७ वर्षांच्या युवराजच्या वनडे कारकिर्दीच्या काळात भारताने १७९ कसोटी सामने खेळले व युवराज केवळ ४० सामन्यांत सहभागी होऊ शकला. युवराजच्या कारकिर्दीवर वनडेचा खेळाडू व फेअरवेल न मिळालेला खेळाडू हे दोन डाग मात्र कायम राहिले.

१. शाहिद आफ्रिदी

स्वत: आफ्रिदीनेही क्वचितच स्वत:ला सफेद रंगाच्या जर्सीमध्ये पाहिले असेल. शाहिद आफ्रिदी हे नाव जरी घेतलं तरी धुव्वांदार फलंदाजी आठवते. आणि हीच धुव्वांदार निडर फलंदाजी कसोटीत कुचकामी ठरते. याचमुळे आफ्रिदेची कसोटी कारकिर्दही तशीच ठरली. लाला या टोपननावाने पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेल्या अष्टपैलू आफ्रिदीने क्रिकेटमधून अनेक वेळा निवृत्ती घेतली व अनेक कमबॅकही केले. वयाच्या १८व्या पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीने २० वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ३९८ सामने खेळले परंतु त्याची कसोटी कारकिर्द मात्र १२ वर्षांचीच राहिली. यात त्याला पाकिस्तानकडून केवळ २७ कसोटी सामने खेळायला मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये ३६ची सरासरी राहिलेल्या या पठ्ठ्याने तेथेही ८७च्या सरासरीने गोलंदाजांना धुण्याचे काम मात्र केले. २५ किंवा अधिक कसोटी सामने खेळलेल्या क्रिकेटपटूंमध्ये शाहिद आफ्रिदीचा स्ट्राईक रेट जगात दोन क्रमांकाचा राहिला परंतु कसोटी क्रिकेट मात्र अतिशय छोटं.

वाचनीय लेख

-१०० कसोटी खेळलेले परंतु १०० वनडेही खेळायला न मिळालेले ५ खेळाडू

-५ असे खेळाडू ज्यांच्या नावावर आहेत ५ विचित्र विक्रम

-वनडेत सर्वाधिक वेळा धावबाद होणारे ५ खेळाडू, एक नाव आहे भारतीय

-सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू

-५ असे क्रिकेटर जे अंडर १९ खेळले एका देशाकडून आणि क्रिकेट खेळले दुसऱ्या देशाकडून

-जगातील सर्वात उंच ५ क्रिकेटपटू, पहिल्या क्रमांकावरील क्रिकेटपटू उंची ऐकून व्हाल अवाक्

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top