Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आरसीबी पुन्हा चॅम्पियन! गुजरातला चारी मुंड्या चित करत दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले

आरसीबी पुन्हा चॅम्पियन! गुजरातला चारी मुंड्या चित करत दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले

हमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यापूर्वी दोन्ही संघ दुसऱ्या किताबाच्या शोधात होते, मात्र अखेर बाजी आरसीबीने मारली.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या. जोस बटलर (20), वॉशिंग्टन सुंदर (50*) आणि अरशद खान (15) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. आरसीबीकडून रसिक दर सलामने 3 विकेट्स घेत गुजरातला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीने 18व्या षटकात विजय नोंदवला. ज्यामध्ये विराट कोहलीने नाबाद (75) अर्धशतकी खेळी केली. व्यंकटेश अय्यरने झटपट 32 धावा केल्या.

आरसीबीने या विजयासह एक खास कामगिरी करुन दाखवली आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेत 2 ट्रॉफी जिंकणारी चौथी टीम ठरली आहे. आरसीबीआधी चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 3 संघांनी 2 वेळा ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच आरसीबी चेन्नईआणि मुंबईनंतर सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports