Thursday, 06 Aug, 12.36 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
आयपीएल २०२० - यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप

आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती, परंतू कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. पण आता बीसीसीआयने जाहीर केले आहे की आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होणार आहे.

काही संघांना या जागेतील बदलांमुळे फायदा होईल, तर काहींना तोटादेखील सहन करावा लागेल. तसेच, जर आपण गोलंदाजांबद्दल विचार केला तर युएईमधील फिरकीपटूंना अधिक मदत मिळते आणि वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करू करतात.

आता आयपीएल २०२० मध्ये पर्पल कॅप शर्यतीत (सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज) थोडा बदल होऊ शकेल. आधी आयपीएल प्रथम भारतीय परिस्थितीत खेळला जात होता आणि आता तो अबूधाबी, शारजाह आणि दुबई अशा युएईच्या ३ मैदानात खेळला जाणार आहे. तर या लेखात त्या ५ गोलंदाजांची नावे आहेत ज्यांना आयपीएलच्या १३ व्या सत्रात पर्पल कॅपचा मान मिळू शकेल.

हे ५ गोलंदाज युएईमध्येपर्पल कॅप कॅप जिंकू शकतात-

१. इम्रान ताहिर (Imran Tahir) - चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर या १३ व्या मोसमात पर्पल कॅप जिंकण्यासाठी दावेदार असू शकतो. आयपीएल २०१८ मध्ये ताहिरचा चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघात समावेश करून घेतला. इम्रान हा कर्णधार धोनीचा सर्वात विश्वसनीय फिरकी गोलंदाज आहे. मागील हंगामात इम्रान ताहिरने कागिसो रबाडाला मागे टाकत २६ गडी मिळवून पर्पल कॅप जिंकली होती.
ताहिरने १७ सामन्यात हा पराक्रम केला. आयपीएलच्या या हंगामात पर्पल कॅप जिंकण्यासाठीही तो प्रमुख दावेदार असेल याची एक नाही अशी अनेक कारणे आहेत.

यूएईमधील खेळपट्टी फिरकीपटू ताहिरसाठी उपयुक्त ठरेल. ताहिर या हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून सीएसकेमध्ये सामील होईल. आता जर ताहिरने या हंगामात पर्पल कॅप जिंकली तर आयपीएलमधील ही त्याची दुसरी पर्पल कॅप असेल आणि तो भुवनेश्वर कुमारची बरोबरी करू शकतो.

२. कागिसो रबाडा (Kagiso Rabada) - दिल्ली कॅपिटल

युवा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा भाग आहे. इशांत शर्माच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजी युनिटमध्ये तो चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटलसाठी खेळत, रबाडाने १२ सामन्यात ७.८२ च्या इकोनॉमीसह २५ बळी घेतले.

मागील सत्रात २५ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलांजादांमध्ये रबाडा दुसरा गोलंदाज होता. दुखापतीमुळे रबाडाला आयपीएल मधूनच सोडावे लागले, अन्यथा तो सुरुवातीपासूनच पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर होता.

आता आयपीएलचे १३ वे सत्र युएईमध्ये होत आहे, तेव्हा रबाडाचे स्विंग बॉल फलंदाजांना त्रास देताना दिसतील. आयपीएलच्या एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर रबाडाने १८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १७.९३ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत.

३. युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal) - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा मुख्य फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल देखील यावेळी पर्पल कॅप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असू शकतो. चहल जवळपास प्रत्येक मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीकडून चमकदार गोलंदाजी करताना दिसत असला तरी चहलसाठी हा मोसम खूप खास ठरू शकतो आणि तो पर्पल कॅपही जिंकू शकतो.

यातील सर्वात मोठे कारण म्हणजे युएईमधील मैदान फिरकी गोलंदाजांना जास्त मदत करतात. खरं तर, आयपीएलच्या १३ व्या सत्रातील सर्व सामने यूएईच्या अबू धाबी, शारजाह आणि दुबई मैदानावर खेळले जातील आणि हे सर्व मैदाने फिरकी गोलंदाजांना उपयुक्त ठरतात.

चहलने आतापर्यंत ८४ आयपीएल सामने खेळले असून २३.१८ च्या सरासरीने १०० बळी मिळवले आहेत. आता जर आरसीबीला आयपीएल २०२० जिंकण्याची इच्छा असेल तर लेगस्पिनर चहलची चांगली कामगिरी होणे संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

४. पॅट कमिन्स (Pat Cummins) - कोलकाता नाईट रायडर्स

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ही आयपीएल २०२० च्या लिलावाची सर्वात मोठी रक्कम मिळवणारा खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटींच्या किंमतीत विकत घेऊन, या वेगवान गोलंदाजाचा त्याच्या संघात समावेश केला आहे. इतक्या मोठ्या किंमतीसह, कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग परदेशी खेळाडू बनला.

पॅट कमिन्सने जगातील जवळजवळ प्रत्येक मैदानावर गोलंदाजी केली आणि आपल्या राष्ट्रीय संघासाठी बळी मिळवले. आता युएईच्या मैदानावरही कमिन्स आपल्या वेगवान चेंडूंनी फलंदाजांना त्रास देऊ शकतो.

पॅट कमिन्सने २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१७ च्या लिलावात दिल्लीने साडेचार कोटींच्या किमतीत आपल्या संघात घेतलं. त्याने दिल्लीकडून १२ सामने खेळले. २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ५ कोटी ४० लाखांची बोली लावून विकत घेतलं.

मात्र दुखापतीमुळे तो खेळला नाही आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला सोडले. आयपीएलच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर कमिन्सने १६ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत.

५. राशिद खान (Rashid Khan) - सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल २०२० मध्ये पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खान देखील आहे. कारण युएईच्या मैदानावर फिरकी गोलंदाजांना बरीच मदत होईल.
राशिद आयपीएल २०२० मध्ये फलंदाजांसाठी मोठे आव्हान देऊ शकतो. मागील हंगामात या फिरकी गोलंदाजाने १७ गडी बाद केले आणि तो जोलंदाजांमध्ये ९ व्या क्रमांकावर होता. आगामी मोसमात राशिदला सनरायझर्स हैदराबादकडून कायम ठेवण्यात आले आहे.
आयपीएल २०१८ मध्ये राशिदने २१ विकेट घेतल्या आणि एंड्रू टाई नंतर सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. अशा परिस्थितीत हा फिरकी गोलंदाज पर्पल कॅप जिंकण्याचा प्रबळ दावेदार असू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top