Monday, 18 Jan, 11.28 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
आयपीएल २०२१ : सुरेश रैनाला मिळणार चेन्नई संघातून डच्चू?

महेंद्रसिंग धोनीचा खास मित्र व भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैना हा कदाचित आयपीएल 2021 मध्ये चेन्नई कडून खेळताना दिसणार नाही. नुकत्याच येत असलेल्या बातम्यांनुसार रैनाचे संघातील स्थान निश्चित मानले जात नाहीये.

रैना संदर्भात बोलताना एक सूत्र म्हणाला, "चेन्नई संघाला सुरेश रैना बद्दल एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. हे बरोबर आहे की रैनाने भूतकाळात संघासाठी उत्तम कामगिरी केलेली आहे, पण या संदर्भात संघाला निर्णय घ्यावा लागेल."

चेन्नई संघाला आपल्या एकूण रकमेतून सुरेश रैनाला अकरा कोटी रुपये द्यावे लागतात. संघ सध्या युवा खेळाडूंना घेण्याच्या मानसिकतेत असून, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की रैनासंदर्भात काय निर्णय घेतला जातो.

आयपीएल स्पर्धेच्या 2008 मधील पहिल्या सत्रापासून रैना चेन्नई सुपर किंग कडून खेळतो आहे. 2016 व 2017 साली चेन्नई संघ स्पर्धेतून बाद करण्यात आला होता, तेव्हा रैना गुजरात संघाकडून खेळला होता. 2018 मध्ये चेन्नईचे पुनरागमनावर झाल्यावर पुन्हा एकदा तो चेन्नई कडून खेळला होता. आयपीएल 2020 मध्ये वैयक्तिक कारणास्तव त्याने माघार घेतली होती.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top