Dailyhunt
आयपीएल 2026 च्या मध्यात अर्जुन तेंडुलकरसाठी आनंदाची बातमी! पुन्हा लागणार बोली, बेस प्राईज 5 लाख रुपये

आयपीएल 2026 च्या मध्यात अर्जुन तेंडुलकरसाठी आनंदाची बातमी! पुन्हा लागणार बोली, बेस प्राईज 5 लाख रुपये

यपीएल २०२६ मध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे, मात्र फ्रॅंचायजीने त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. अशातच त्याच्यासाठी एक आनंदाचे वृत्त समोर येत आहे. त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टी२० मुंबई लीगच्या (टीएमएल) लिलावात सहभागी होण्यासाठी परवानगी दिली आहे.

हा लिलाव २ मे ला होणार आहे.

या लिलावात अर्जुनसोबत विकेटकीपर-फलंदाज सिद्धांत आधतराव हा पण सहभागी होणार आहे. त्याने २०२४-२५ हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. मागील वर्षी तो पॉंडिचेरीकडून खेळला होता, तर अर्जुन गेल्या काही हंगामापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. एमसीएच्या नियमांनुसार, दुसऱ्या संघटनेसाठी पाहुणा खेळाडू म्हणून परतणाऱ्या स्थानिक खेळाडूला एका वर्षाचा अनिर्वाय कूलिंग-ऑफ कालावधी पाळावा लागतो. मुंबई टी२० लीगच्या प्रकरणात हा नियम लागू होणार नाही, अशी माहिती एमसीएचे (मुंबई क्रिकेट असोसिएशन) सचिव उन्मेश खानविलकर यांनी दिली.

"मागील १२ महिन्यांमध्ये दोघांनी आपापल्या राज्यांच्या कोणत्याही टी२० लीगमध्ये भाग घेतला नव्हता. यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार, ते टी२० मुंबई लीगमध्ये खेळण्यास पात्र आहेत," असेही खानविलकर यांनी पुढे सांगितले आहे. तसेच सिद्धांतने पॉंडिचेरी क्रिकेट असोसिएसनकडून आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र एमसीएला दिले असल्याचीही माहिती सचिवांनी दिली.

या लिलावात अर्जुनची मूळ किंमत ५ लाख रुपये आहे, जी सर्वोच्च किंमत श्रेणी आहे. त्याला २०२६ च्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सकडून ट्रेडद्वारे लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला. त्याला संघाने अद्याप एकही सामना खेळण्याची संधी दिली असून तो नेटमध्ये मात्र सराव करताना दिसतो.

मुंबईच्या या टी२० लीगमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांना त्यांच्या संघांनी कायम ठेवले आहे. तसेच यशस्वी जायस्वाल आणि अजिंक्य रहाणे हे पण या चौथ्या हंगामात खेळणार आहेत. ३१ मे ला आयपीएल संपल्यानंतर २ जूनपासून ही लीग सुरू होणार आहे.

या लीगच्या २०१९ च्या हंगामाआधी अर्जुनला आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्बने ५ लाख रुपयांना विकत घेतले होते, तर सिद्धांत मागील हंगामात सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्टकडून खेळला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports