Friday, 03 Jul, 2.48 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
आयपीएल नाही झाली म्हणून काय झालं, ऑगस्टमध्ये होणार ही मोठी प्रीमीयर लीग

श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) ८ ते २२ ऑगस्ट दरम्यान पहिल्या टी२० लीगचे आयोजन करण्याचा विश्वास आहे. कोविड-१९ साथीमुळे सरकारने देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाची सेवा पुन्हा सुरू होणारी तारीख १ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.

या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून एसएलसीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. परंतु लंका प्रीमियर लीग (एलपीएल) चे भविष्य देशाच्या सीमा उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.

श्रीलंका क्रिकेट सेक्रेटरी एशले डीसिल्वा(Ashley De Silva) यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, "आम्ही महामहिम (राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे) यांच्याशी बोलण्याची अपेक्षा करत आहोत आणि आम्ही काही निष्कर्षापर्यंत पोहोचतो की नाही हे पाहू."

ते म्हणाले, "श्रीलंकेने या भागातील इतर देशांच्या तुलनेत कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे चांगले कार्य केले आहे आणि म्हणूनच या मालिकेत परदेशी खेळाडू सहभागी होण्यात रस दाखवत आहेत."

श्रीलंकेत कोरोना विषाणूच्या २००० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये १७०० हून अधिक बरे झाले आहेत. फ्रँचायझींवर आधारित लंका प्रीमियर लीगमध्ये पाच संघ सहभागी होण्याची अपेक्षा केली जात आहे.

या स्पर्धेचा कालावधी नुकताच पुढे ढकलण्यात आलेल्या भारत दौर्‍यावर अवलंबून असेल. दोन्ही बोर्ड ऑगस्टमध्ये तो आयोजित करण्यासाठी पर्यायांवर विचार करीत आहेत. डीसिल्वा म्हणाले, "आम्ही सध्या स्पर्धेत २३ सामने आयोजित करण्याचा विचार करीत आहोत. पण जर भारत खेळायला तयार झाला तर कदाचित आम्ही फक्त १३ सामने आयोजित करू शकू," असे ही डीसिल्वा म्हणाले.

वानखेडेवर झालेल्या पराभवामुळे संगकाराची झाली तब्बल ५ तास चौकशी, नाराज संगकारा.

सासऱ्यांच्या अंत्यविधीला गेलेल्या क्रिकेट कोचच्या नोकरीवर येणार गदा? पहा काय झाला निर्णय

कोहली व गांगुलीच्या कसोटीत जर मॅच झाली तर हा संघ जिंकणार, कारणही आहे तसेच

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top