Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Asia Cup 2026: यजमानपदाबाबत मोठी अपडेट, भारत आणि पाकिस्तान 'या' देशात येणार समोरा-समोर!

Asia Cup 2026: यजमानपदाबाबत मोठी अपडेट, भारत आणि पाकिस्तान 'या' देशात येणार समोरा-समोर!

हिला क्रिकेट संघांच्या आशिया कप 2026 स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेचे यजमानपद कोण भुषविणार, ही माहिती समोर येत आहे. आशिया चषक समितीने (ACC) अद्याप अधिकृतपणे स्थळाची स्पष्टता केलेली नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आयोजित केली जाणार आहे.

या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानही भिडणार आहेत.

महिला आशिया कप 2026 स्पर्धा टी20 स्वरूपाची होणार आहे. याचे सामने 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळले जाणार आहेत. यामध्ये 8 संघांचा समावेश असणार आहे.

अहवालानुसार, सर्व सहभागी देशांना स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत अनौपचारिक माहिती देण्यात आली आहे. टी20 आशिया चषकाची ही सहावी आवृत्ती आहे. यामध्ये गतविजेता श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि UAE या आठ संघांचा समावेश असेल.

ACC लवकरच स्पर्धेचे वेळापत्रत अधिकृतपणे जाहीर करणार आहेत, कारण ते अध्यक्षांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आशिया चषक समितीचे प्रमुख आहेत.

आशिया कप 2026 चा अंतिम सामना
अहवालामध्ये पुढे म्हटले गेले की, 22 जुलै रोजी संघांना एक ईमेल पाठवण्यात आला, ज्यामधून स्पर्धेचा लोगो शेअर केला गेला. तेव्हा ACC ने सांगितले होते की, ठिकाणांना अंतिम स्वरुप दिले जात आहे, मात्र संघ 27 ऑगस्ट रोजी दाखल होणार आहेत. तसेच अंतिम सामना 13 सप्टेंबर रोजी नियोजित आहे.

तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट संघांचे सामने 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेले आहेत. (Major update Asia Cup 2026 likely held in uae but acc yet to formally announce)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports