Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
AUS vs ENG Final: घरच्या मैदानावर इंग्लंड अभेद्य! ऑस्ट्रेलिया सातव्या जेतेपदासाठी इतिहास घडवणार?

AUS vs ENG Final: घरच्या मैदानावर इंग्लंड अभेद्य! ऑस्ट्रेलिया सातव्या जेतेपदासाठी इतिहास घडवणार?

स्ट्रेलिया आणि इंग्लंड (icc T20 women's World Cup final Australia vs England) यांच्यातील महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 5 जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली, तर इंग्लंडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात केली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत दोन्ही संघ अद्याप एकही सामना हरलेले नाहीत. त्यामुळे रविवारी यातील एका संघाचा विजयाचा प्रवास थांबणार हे नक्की. जो संघ जिंकेल, तो चॅम्पियन ठरेल. ऑस्ट्रेलियाला सातव्यांदा जेतेपद मिळवायचे असेल, तर त्यांना इतिहास घडवावा लागेल.

इंग्लंडचा महिला संघ आजपर्यंत आपल्या मायदेशात एकही टी-20 विश्वचषक सामना हरलेला नाही. 2009 पासून ते 2026 च्या उपांत्य फेरीपर्यंत, इंग्लंडने घरच्या मैदानावर 11 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी इंग्लंडचा हा विजयी रथ रोखावा लागेल. ऑस्ट्रेलिया आठव्यांदा तर इंग्लंड पाचव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी सहा वेळा विश्वचषक जिंकला आहे, तर 2016 च्या फायनलमध्ये त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता.

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 45 सामने झाले आहेत. त्यापैकी 22 सामने ऑस्ट्रेलियाने, तर 20 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दोन सामने टाय झाले आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. हे आकडे पाहता, अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होईल हे स्पष्ट आहे. 2009 चा टी-20 विश्वचषक इंग्लंडमध्येच झाला होता आणि तेव्हा इंग्लंडने फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून विजेतेपद मिळवले होते. यावेळी इंग्लंड आपला दुसरा टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports