Monday, 25 Jan, 8.48 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने पराभूत करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. कमालीच्या अटीतटीच्या झालेल्या या मालिकेत वापरल्या गेलेल्या चारही खेळपट्ट्यांची रेटिंग आयसीसीने जाहीर केली. 'एवरेज' ते 'व्हेरी गुड' असे शब्द या खेळपट्ट्यांसाठी वापरले गेले आहेत. विशेष म्हणजे भारताला पराभव पत्करावा लागलेल्या ऍडलेडच्या खेळपट्टीला सर्वोत्तम खेळपट्टी म्हणून गौरविण्यात आले.

आयसीसीने दिली खेळपट्ट्यांना रेटिंग

ऍशेसनंतर सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका अशी ख्याती असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी संघाला पराभूत करत कब्जा केला. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका विजय मिळवण्याची किमया या मालिकेतून केली. पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतरही भारताने आत्मविश्वास ढळू न देता जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यानंतर आता मालिकेतील चारही खेळपट्ट्यांना आयसीसीने रेटिंग दिली.

एॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत भारताला तिसऱ्याच दिवशी नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे याच खेळपट्टीला 'वेरी गुड' अशी रेटिंग आयसीसीने दिली. भारताने विजय मिळवलेल्या मेलबर्न कसोटीच्या खेळपट्टीला 'गुड आणि व्हेरी गुड' म्हटले गेले. नाट्यमयरित्या अनिर्णित राहिलेल्या सिडनी कसोटीला 'एवरेज आणि व्हेरी गुड' तर भारताने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करत जिंकलेल्या ब्रिस्बेन कसोटीच्या 'गुड आणि व्हेरी गुड' अशी रेटिंग दिली गेली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली प्रतिक्रिया

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या रेटिंगनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"आम्ही चांगल्या प्रतिस्पर्धांसाठी दर्जेदार खेळपट्ट्या बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो. स्पर्धात्मक क्रिकेटसाठीच आम्ही अशा प्रकारच्या खेळपट्ट्या बनवितो."

उभय संघाकडून मालिकेत ३,९०० धावांसोबत १३० बळी देखील घेतले गेले. या हाय-व्होल्टेज मालिकेचा शेवट अखेरच्‍या कसोटीच्या अंतिम सत्रात झाला. ज्यात, भारताने रोमांचक विजय मिळवून मालिका आपल्या नावे केली.

महत्वाच्या बातम्या:

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

रिषभ पंतला अजूनही वाटते त्या पराभवाची खंत, म्हणाला

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ही विक्रमी कामगिरी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top