Thursday, 22 Jul, 4.44 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! सराव सामन्यात गोलंदाजांनी दाखवला दम, पाहा कशा घेतल्या विकेट

भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. २० जुलै पासून भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली छाप सोडल्यानंतर आता गोलंदाजही इंग्लिश फलंदाजांचा घाम काढताना दिसून येत आले आहेत.

या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघाकडून केएल राहुलने तुफानी शतकी खेळी केली. तर,रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात ३११ धावसंख्या उभी केली. तसेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत अवघ्या ५६ धावांवर काउंटी संघाचे ४ फलंदाज माघारी धाडले होते.

भारतीय गोलंदाज सराव सामन्यात विकेट घेत असतानाचे व्हिडिओ डरहॅम क्रिकेटच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादव इंग्लिश फलंदाजाला क्लीन बोल्ड करताना दिसून येत आहे. काउंटी संघाचा पहिला डाव केवळ २२० धावांवर संपुष्टात आला आहे. त्यांच्याकडून केवळ हसीब हमीदला ११२ धावांची शतकी खेळी करता आली. अन्य कोणताही फलंदाज फार काही करु शकले नाही.

भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. तर, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. (Indian bowlers shines against select county eleven,watch video)

पहिल्या डावात भारतीय संघाची अप्रतिम फलंदाजी
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने १०१ धावांची खेळी केली.या दरम्यान त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावला होता. यासोबतच जडेजाने ७५ धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला होता. दोन्ही फलंदाजांमध्ये पाचव्या गडीसाठी १२७ धावांची भागीदारी झाली होती.

इंग्लंड विरुद्ध भारत ५ कसोटी सामन्यांची मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर

टोकिया ऑलिंपिकमध्ये उतरण्यापूर्वी पीव्ही सिंधूला आई- वडिलांकडून मिळाले खास सरप्राईज; एकदा पाहाच

केएल राहुलच्या 'त्या' कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top