Thursday, 22 Jul, 5.20 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
भारीच! स्टार्कने टाकलेल्या चेंडूने बेल्स तर उडवलेच, पण स्टंपलाही उडवले दूरवर, फलंदाजही शॉक, पाहा व्हिडिओ

टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा ४-१ ने धुव्वा उडवल्यानंतर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मंगळवारी (२० जुलै ) पार पडला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार १३३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मिचेल स्टार्कने एक अप्रतिम चेंडू टाकला होता. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या वेगवान चेंडूचा सामना करण्यापूर्वी फलंदाजाचा थरकाप उडालेला असतो. तर झाले असे की पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघ फलंदाजी करत असताना तिसरे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर फलंदाज जेसन मोहम्मदचा ऑफ स्टंप उडून दूर जाऊन पडला. मिचेल स्टार्कने सरळ चेंडू टाकला होता, जो जेसन मोहम्मदला कळालाच नाही आणि बॅट चेंडूपर्यंत येईपर्यंत फलंदाज बाद झाला होता.(West Indies vs austrelia 1st odi, Mitchell starc sends Jason Mohamads off stump for a walk)

पावसामुळे हा सामना ४९-४९ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान ॲलेक्स कॅरीने ८७ चेंडुंमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ६७ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला ९ गडी बाद २५२ धावा करण्यात यश आले होते. परंतु, डकवर्थ लुईस नियमानुसार,वेस्ट इंडिज संघाला २५७ धावांचे आव्हान मिळाले होते.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीज संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २६.२ षटकात १२३ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडीज संघाकडून कर्णधार कायरोन पोलार्डने ५७ चेंडुंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने सर्वाधिक ५६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या स्पर्धेतील दुसरा वनडे सामना २३ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

गिल, आवेश पाठोपाठ भारताचा अष्टपैलू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, सराव सामन्यात झाली दुखापत

'ड्रायव्हर म्हणून कसा आहे विराट?' गेलने दिले 'हे' उत्तर

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! सराव सामन्यात गोलंदाजांनी दाखवला दम, पाहा कशा घेतल्या विकेट

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top