Tuesday, 15 Oct, 6.20 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
चाहते टेन्शनमध्ये, गांगुली अध्यक्ष झाला आता रवी शास्त्रींचं काय?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार असल्याचे जवळजवळ पक्के झाले आहे. त्याला या अध्यक्षपदावर अधिकृतरित्या 23 ऑक्टोबरला नियुक्त केले जाईल.

गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार असल्याने अनेक चाहत्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गांगुली यांच्यात चांगले संबंध नसल्याची आठवण करुन दिली आहे.

शास्त्री आणि गांगुलीमध्ये फारसे चांगले संबंध नसल्याचे 2016 ला भारतीय संघासाठीच्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेवेळी समोर आले होते. त्यावेळी गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडूलकर यांचा समावेश असणाऱ्या सल्लागार समितीने शास्त्रींना डावलून अनिल कुंबळेची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती.

त्यामुळे शास्त्रींनी त्यांची प्रशिक्षक म्हणून निवड न झाल्याने गांगुलीवर निशाणा साधला होता. तर गांगुलीने म्हटले होते की शास्त्रींनी व्हिडिओ कॉलवरु मुलाखत देण्यापेक्षा प्रत्यक्ष उपस्थित रहायला हवे होते.

या घटनेची आठवण ठेवून चाहत्यांनी गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार असल्याने शास्त्रींना ट्रोल केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>