Wednesday, 15 Sep, 7.12 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
चक्क इंग्लंडच्या अव्वल फलंदाजाने गायले भारतीय वेगवान गोलंदाजांचे गुणगान, म्हणाला.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका चार सामन्यानंतर थांबवली गेली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने मॅंचेस्टर येथे होणारी अखेरची कसोटी खेळण्यास नकार दिला. या मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत वाहवा मिळवली. भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीने चक्क विरोधी संघातील फलंदाजांनाही कौतुक करण्यास भाग पाडले. या मालिकेत भारतीय गोलंदाजांना सामोर्‍या गेलेल्या एका इंग्लिश फलंदाजाने भारताच्या गोलंदाजी विभागाचे गुणगान गायले.

भारतीय गोलंदाजांना समजणे अवघड
सदर कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यानंतर इंग्लंड संघात समाविष्ट केल्या गेलेल्या डेव्हिड मलानने नुकतेच एका मुलाखतीत भारतीय वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला,
"भारतीय वेगवान गोलंदाज आक्रमण अव्वल आहे. शमी, बुमराह व मोहम्मद सिराज हे तिघेही वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज आहेत. त्यामुळे या तिघांनाही समजणे अवघड होते. त्यांच्याविरुद्ध खेळणे सवय होऊ शकत नाही. कारण, आपण एकाला सांभाळून घेतले तर दुसरा नवीन आव्हान तयार ठेवतो. या सर्वांनी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली."
मलानने या मुलाखतीत भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचेही गुणगान गायले. तो या मालिकेत खेळला नाही याबाबत त्याने आश्चर्य व्यक्त केले.

अखेरचा सामना नाही खेळला गेला
मॅंचेस्टर येथील नियोजित पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना बाधित आढळून आले होते. सर्व भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर कसोटी सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, भारतीय खेळाडूंनी संभाव्य धोका न पत्करता कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आले आहेत. ईसीबीने या निर्णयामुळे आपले ३०० पेक्षा अधिक कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी या कसोटीच्या निकालासाठी आयसीसीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केलेली. भारताने या कसोटीचा पर्याय म्हणून पुढील दौऱ्यात दोन अतिरिक्त टी२० सामने खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

दिवाळीआधी देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! बीसीसीआय करणार घसघशीत वेतनवाढ

https://mahasports.in/uae-government-allowed-fans-for-ipl-remainder/

https://mahasports.in/mumbai-indians-launch-new-theme-song/

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top