Thursday, 22 Jul, 4.52 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
'ड्रायव्हर म्हणून कसा आहे विराट?' गेलने दिले 'हे' उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल हे अगदी जिगरी मित्र म्हणून सर्वांना ज्ञात आहेत. मैदानावर तसेच मैदानाबाहेर हे दोघे नेहमी मजामस्ती करताना दिसून येतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोघांनी अनेक वर्षे एकत्रितरीत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (आरसीबी) आपला खेळ दाखवला. त्या दरम्यानची विराटबद्दलची एक आठवण गेलने नुकतीच एका मुलाखतीत सांगितली.

विराट ड्रायव्हर म्हणून कसा आहे?
विराट कोहली आणि ख्रिस गेल हे २०११ ते २०१७ या काळात आरसीबी संघाचे एकत्रितपणे सदस्य होते. याच काळात या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. आयपीएल व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील हे दोघे अनेकदा मस्ती करताना दिसून येत. त्याचवेळी, आयपीएलचा सामना खेळण्यासाठी आरसीबी संघ दिल्लीत आला असताना विराटने आपल्या पांढऱ्या ऑडी आर८ या आलिशान सुपर कारमधून गेलला फेरफटका मारून आणला होता.

याविषयी एका मुलाखतीत गेलला 'विराट कसा ड्रायव्हर आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गेल म्हणाला, "अप्रतिम, तो पायलटदेखील बनू शकतो. तो गाडी चालवत नाही तर उडवतो." गेल आणि विराट नेहमीच क्रिकेटमधून मोकळा वेळ मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी मस्ती करताना दिसत असतात.

विराट आहे ऑडीचा ब्रँड अँबेसिडर
जगातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत क्रिकेटपटू असलेला विराट कोहली जगप्रसिद्ध जर्मन कार कंपनी ऑडीचा २०१५ वर्षापासून ब्रँड अँबेसिडर आहे. त्याला ऑडीचा भारतातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाते. या वर्षी जून महिन्यात त्याने आपला करार आणखी एका वर्षासाठी वाढवून घेतल्याचे सांगितले जात आहे.

सध्या विराट भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्यावर असून, तेथे तो इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्यानंतर, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तो आरसीबीचे उर्वरित आयपीएल २०२१ मध्ये नेतृत्व करेल. युएई व ओमान येथे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या टी२० विश्वचषकात तो भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल.

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! सराव सामन्यात गोलंदाजांनी दाखवला दम, पाहा कशा घेतल्या विकेट

टोकिया ऑलिंपिकमध्ये उतरण्यापूर्वी पीव्ही सिंधूला आई- वडिलांकडून मिळाले खास सरप्राईज; एकदा पाहाच

केएल राहुलच्या 'त्या' कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top