Monday, 28 Sep, 7.52 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
गजब! २ तासांच्या आतच मोडला आयपीएलमधील 'मोठा' विक्रम

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ९वा सामना रविवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडला. शारजाह येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थान संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या. पंजाबचे २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ६ विकेट्स गमावत केवळ १९.३ षटकात पूर्ण केले.

दरम्यान एक गजब कारनामा घडला आहे. या सामन्यात सुरुवातीला पंजाब संघाने एक नवा विक्रम त्यांच्या नावावर केला. तर त्या विक्रमाला २ तासदेखील पूर्ण झाले नाहीत, तोपर्यंत राजस्थान संघाने पंजाबचा तो विक्रम मोडत आपल्या नावावर नोंदवला.

झाले असे की, राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाब संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण आले. पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी सामन्याची सुरुवात केली. या दोन्ही धुरंधर फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत पहिल्या ५ षटकांनंतर म्हणजेच पावरप्लेनंतर संघाचा स्कोर शून्य बाद ६० धावांवर आणला.

यासह पंजाब संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा शानदार विक्रम केला. पण पंजाबचा डाव संपल्यानंतर राजस्थानचे फलंदाज जोस बटलर (४), स्टिव्ह स्मिथ (३७) आणि संजू सॅमसन (२३) यांनी मिळून पावरप्लेमध्ये ६९ धावा केल्या. त्यामुळे २ तासांच्या आतच आयपीएल २०२०मध्ये पावरप्लेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पंजाब संघाऐवजी राजस्थान संघाच्या नावावर झाला.

मेड इन इंडिया! आयपीएलमध्ये दूसऱ्यांदाच घडला भारतीयांकडून 'हा' अनोखा विक्रम

आता सचिनसह राहुल आणि मयंक अगरवालचेही 'या' विक्रमात घेतले जाणार नाव

एकमेवाद्वितीय मयंक! 'अशी' अतुलनीय कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज

सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १६- दुर्दम्य इच्छाशक्तीचा 'बाला-ली'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top