Thursday, 22 Jul, 5.12 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
गिल, आवेश पाठोपाठ भारताचा अष्टपैलू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, सराव सामन्यात झाली दुखापत

भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांचा सध्या काउंटी एकादश संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत. या दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून गेलेल्या वेगवान गोलंदाज आवेश खानपाठोपाठ संघाचा युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला आहे. दोन्ही खेळाडूंच्या बोटाला दुखापत झाल्याने ते आता भारतात परततील.

भारतीय संघाविरुद्ध खेळत होते दोघे
कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ आपला पहिला सराव सामना काउंटी एकादश संघाविरुद्ध डरहॅम येथे खेळत आहे. काउंटी एकादश संघाचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्याने अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. त्याचमुळे काउंटी संघाने त्यांचा अंतिम ११ जणांचा संघ तयार करण्यासाठी भारतीय संघाकडे काही खेळाडूंची मागणी केली होती. त्यानुसार या सराव सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे दोन भारतीय खेळाडू काउंटी एकादश संघाकडून खेळत होते.

या तीन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी आवेश खान गोलंदाजी करत असताना हनुमा विहारीने मारलेला एक वेगवान फटका अडवताना त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर येऊन लागला. अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यानंतर तो दौऱ्यातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना सुंदरच्या देखील बोटाला दुखापत झाली व तो देखील दौऱ्यातून बाहेर निघाला. हे दोन्ही खेळाडू पुढील उपचारासाठी आता भारतात परत येतील.

शुबमन गिल आधीच पडला आहे दौऱ्यातून बाहेर
इंग्लंड दौऱ्यात भारताला ४ ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला आहे. गिलच्या डाव्या पायाला दुखापत झाली असल्याने तो सहा-सात आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे तो या मालिकेसाठी उपलब्ध नसेल. त्याला पर्यायी खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्यात यावे असे संघ व्यवस्थापनाकडून कळवले गेले होते. परंतु, निवड समितीने यावर सध्या काहीही निर्णय घेतलेला नाही.

'ड्रायव्हर म्हणून कसा आहे विराट?' गेलने दिले 'हे' उत्तर

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! सराव सामन्यात गोलंदाजांनी दाखवला दम, पाहा कशा घेतल्या विकेट

टोकिया ऑलिंपिकमध्ये उतरण्यापूर्वी पीव्ही सिंधूला आई- वडिलांकडून मिळाले खास सरप्राईज; एकदा पाहाच

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top