Dailyhunt
हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकला, सूर्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व; कारण आले समोर

हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकला, सूर्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व; कारण आले समोर

यपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार, ४ एप्रिल) दोन सामने खेळले जात आहेत. यातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्याला मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या मुकला आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. नाणेफेकेवेळी सूर्यकुमारने हार्दिकच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुंबईचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार उपस्थित होता. त्याने हार्दिकची तब्येत ठिक नसल्याने तो आज खेळणार नाही, असे सांगितले आहे.

सूर्यकुमार मागील सामन्यात (कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध) इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला होता. तो हार्दिकबाबत म्हणाला, "त्याची प्रकृती ठिक नाही आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो आजच्या सामन्यासाठी फिट नव्हता."

दिल्लीचा कर्णधार अक्षरने नाणेफेक जिंकल्यानंतर संघाच्या अंतिम अकरामध्ये कोणताही बदल झाला नाही असे सांगितले आहे. दुसरीकडे मुंबईच्या संघात बरेच बदल झाले आहे. हार्दिकच्या जागी दीपक चहरला घेतले असून ट्रेंट बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉशला संधी देण्यात आली. अल्लाह गझफरच्या जागी मिचेल सॅंटनरला घेतले आहे.

संघ-
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन)- केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार.
इम्पॅक्ट प्लेयर - आशुतोष शर्मा, औकिब नबी दार, समीर रिझवी, दुष्मंथा चमीरा, करुण नायर

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन)- रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट प्लेयर- मयंक मार्कंडे, रॉबिन मिंज, राज बावा, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports