Thursday, 14 Oct, 12.12 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
हताश..निराश..नाराज! रबाडाने दांडी गुल करताच चिडला दिनेश कार्तिक, हाताने उडवला स्टंप

कोणत्याही क्रिकेट सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजांमध्ये संघर्ष पाहायला मिळाले, साहजिक असते. कधी कधी एखादी मोठी विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज आनंदाच्या भरात जरा जास्तच आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसतो. तर फलंदाजही विकेट गमावल्याने हताश होऊन बॅट आपटणे, हेल्मेट फेकणे अशी कृत्ये करतात. असेच काहीसे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात घडले आहे.

या महत्त्वपूर्ण सामन्यात कोलकाता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक साधी एकही धाव करू शकला नाही. याचाच संताप व्यक्त करताना तो कॅमेरात कैद झाला आहे.

त्याचे झाले असे की, दिल्लीच्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कार्तिक सतराव्या षटकात फलंदाजीला आला होता. यावेळी कोलकाता संघ ३ बाद १२३ धावा अशा स्थितीत होता. परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी या अंतिम षटकांमध्ये कोलकाताच्या फलंदाजांचा चांगलाच घाम काडला. सुरुवातीच्या दोन्हीही चेंडूवर एकही धाव न घेऊ शकल्यानंतर अठराव्या षटकात राहुल त्रिपाठी स्ट्राईकवर आला. त्याने १८.५ चेंडूवर कशीबशी १ धाव काढली.

त्यानंतर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी कार्तिक स्ट्राईकवर आला होता. परंतु गोलंदाज कागिसो रबाडाने जबरदस्त चेंडू टाकला आणि कार्तिकला काही कळायच्या आत त्याची दांडी उडाली. अशाप्रकारे फक्त शून्य धावांवर आपली विकेट गेल्याने कार्तिकला राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या हाताने स्टंप्स उखडले. त्याची ही कृती कॅमेरात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

दिनेश कार्तिकला बीसीसीआयने फटकारले
महत्त्वाची बाब म्हणजे, कार्तिकला त्याच्या या कृतीसाठी बीसीसीआयकडून शिक्षाही झाली आहे. त्याची ही कृती आयपीएलच्या लेव्हल १ च्या कलम २.२ चे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याला फटकारले आहे.

याबाबत आयपीएलने निवेदनात म्हटले की, "कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. दिनेश कार्तिकने लेव्हल १ च्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. तसेच त्याने आपली चूक देखील मान्य केली आहे. लेव्हल १ च्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संघांच्या रेफरींचा निर्णय अंतिम निर्णय असतो."

त्रागा भोवला; फायनलपूर्वी दिनेश कार्तिकला बीसीसीआयची फटकार, 'ते' कृत्य केल्याने झाली शिक्षा

चेन्नईसाठी विजेतेपदाचं स्वप्न तितके सोपेही नाही! कोलकाताचा 'हा' रेकाॅर्ड तोंडात बोटे घालायला लावणारा

फायनलपूर्वी कोलकाताच्या गोटात चिंतेचे वातावरण! खुद्द कॅप्टन अडकलाय 'शुन्या'च्या गर्तेत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top