Sunday, 09 Aug, 10.52 pm महा स्पोर्ट्स

टॉप बातम्या
हे ३ वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये ठोकू शकतात शतक

क्रिकेट हा एक आकड्यांचा खेळ आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी नवीन विक्रम नोंदवले गेले आणि जुने विक्रम तोडले गेले. कसोटी हे क्रिकेटचे सर्वात प्रदीर्घ स्वरूप असूनही आजच्या तरूणांचे लक्ष वेधून घेत नाही, परंतु असे काही विक्रम क्रिकेटमध्ये घडले आहेत, जे खरोखर मनोरंजक आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागसारख्या सलामी फलंदाजाने केलेले ३०० धावा किंवा ब्रायन लाराचे केलेल्या ४०० धावा असतील.

कसोटी क्रिकेटबद्दल बोललो तर नेहमी गोलंदाजाचे महत्त्व अधिक असते, ५ दिवस गोलंदाज फलंदाजांवर आपले वर्चस्व कायम ठेवत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी फलंदाजीमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, जर आपण भारताबद्दल बोलायचे तर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग सारख्या दिग्गज गोलंदाजांनी कसोटीत शतके ठोकली आहेत.

आज या लेखात तुम्हाला अशा ३ वेगवान गोलंदाजांविषयी सांगणार आहोत, जे भविष्यात फलंदाजीद्वारे शतक ठोकू शकतात.

१. टिम साउथी (Tim Southee) - न्यूझीलंड

या यादीतील पहिले नाव न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टिम साउथीचे आहे. टिम साऊदी देखील कसोटी क्रिकेटमध्ये शतक करू शकतो. कारण तो उत्तम फलंदाजी करतो. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक षटकार ठोकणार्‍या टीम साऊथीने न्यूझीलंड संघासाठी आतापर्यंत एकूण ७३ सामने खेळले आहेत आणि या वेळी त्याच्या फलंदाजीने १८.२० च्या सरासरीने १६६८ धावा केल्या आहेत. टिम साऊदीनेही १०६ डावांमध्ये पाच वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ७७ आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही टीम साऊथीने शतक झळकावले असून सात अर्धशतकेही त्याच्या फलंदाजीतून आली आहेत. इतकेच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील साउथीची सर्वोत्तम धावसंख्या १५६ आहे. त्यामुळे टीम साऊथीच्या बॅटमधून आगामी काळात एखादे शतक येऊ शकते.

२. पॅट कमिन्स (Pat Cummins) - ऑस्ट्रेलिया

या यादीतील दुसरे नाव ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स असेल. २६ वर्षीय वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावू शकतो. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने ३० कसोटी सामने खेळले आहेत आणि यात ६४७ धावा जमविल्या आहेत. कसोटीत कमिन्सच्या नावे दोन अर्धशतकेदेखील नोंदवली गेली आहेत.

पॅट कमिन्सची कसोटीत सर्वाधिक धावसंख्या ६३ धावा आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पॅट कमिन्सने ४३ सामन्यांत चार अर्धशतके ठोकली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कमिन्सची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८२ अशी आहे.

पॅट कमिन्सने कसोटी क्रिकेटमधील दोन अर्धशतके (५० धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका) आणि(६३ धावा विरुद्ध भारत) यांच्या विरुद्ध ही कामगिरी केली. पॅट कमिन्स तळात फलंदाजी करताना वादळी शैलीत खेळू शकतो. अशा परिस्थितीत पॅट कमिन्सच्या फलंदाजीतून कसोटी शतक येऊ शकते.

३. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) - भारत

सध्याच्या गोलंदाजीत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, भुवीने बऱ्याच वेळा आपल्या बॅटने भारताला सामने जिंकून दिले आहेत. भुवनेश्वर कुमार भारतीय संघाकडून आतापर्यंत २१ कसोटी सामने खेळला असून यात २९ डावात ५५२ धावा करण्यास यशस्वी झाला आहे. कसोटीत भुवीच्या नावावरही तीन अर्धशतकांची नोंद आहे. या स्वरुपात भुवनेश्वरची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ६३ आहे.

विशेष म्हणजे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारच्या नावावर शतकही नोंदवले गेले आहे. उत्तर विभागाच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात भुवनेश्वर कुमारने ३१२ चेंडूत १२८ धावा केल्या होत्या. २०१४ च्या इंग्लंड दौर्‍यावर भुवनेश्वर कुमारने सलग तीन डावांमध्ये अर्धशतके ठोकली होती.

ट्रेंडिंग लेख -

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना फ्लॉप झालेले ३ दिग्गज परदेशी खेळाडू

एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर

वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण.

दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा 'हा' खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल.

रिषभ पंतने 'या' दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top