Thursday, 14 Oct, 12.52 pm महा स्पोर्ट्स

नवे लेख
हे फक्त रिषभच करू शकतो! लाईव्ह सामन्यात पंतने चक्क अंपायरसोबत खेळला लपंडाव, तुम्हीही पाहा

बुधवारी (१३ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरा क्वालिफायरचा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आणि आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंतने असे काही कृत्य केले होते, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. तो फलंदाजी करत असताना आक्रमक फलंदाजी करत असतो. परंतु मिळालेल्या रिकाम्या वेळात तो मस्ती देखील करताना दिसून येत असतो. असाच काहीसा मजेशीर प्रकार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना सुरू होण्यापूर्वी घडला.

तर झाले असे की, नाणेफेक झाल्यानंतर पंचांनी दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाजांना चेंडू निवडण्यास सांगितले होते. त्यावेळी आर अश्विन चेंडूची निवड करत होता. यावेळी कर्णधार रिषभ पंतला पंचांसोबत मस्ती करण्याची संधी मिळाली होती. त्याने यावेळी पंचांसोबत लपंडाव खेळायला सुरुवात केली. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या निर्णायक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या २ चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठीने षटकार मारून या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता.

हताश..निराश..नाराज! रबाडाने दांडी गुल करताच चिडला दिनेश कार्तिक, हाताने उडवला स्टंप

त्रागा भोवला; फायनलपूर्वी दिनेश कार्तिकला बीसीसीआयची फटकार, 'ते' कृत्य केल्याने झाली शिक्षा

चेन्नईसाठी विजेतेपदाचं स्वप्न तितके सोपेही नाही! कोलकाताचा 'हा' रेकाॅर्ड तोंडात बोटे घालायला लावणारा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top