Wednesday, 05 May, 8.28 am महा स्पोर्ट्स

नवे लेख
हीच का तुमची संवेदनशीलता? आयपीएल संघाच्या बससाठी पोलिसांनी ऍम्ब्युलन्सला थांबवले, व्हिडिओ व्हायरल

कोरोना व्हायरस या जागितक महामारीने भारतात थैमान घातले आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या कडक बायो बबलमध्येही या महामारीचा शिरकाव झाल्याने ४ मे रोजी उर्वरित हंगाम स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आयपीएलशी निगडित आहे.

या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, ट्राफिक जंक्शनवर एका आयपीएल फ्रँचायझीच्या बसला जाण्यासाठी पोलिस रस्ता मोकळा करताना दिसत आहेत. दुर्दैवाची बाब अशी की, बससाठी मार्ग बनवताना एका रुग्णवाहिकेला (एम्ब्युलन्स) बाजूला प्रतिक्षा करावी लागली आहे. अहमदाबाद शहरातील पंजरापोल चौकातील ट्राफिक जंक्शनवरील ही घटना आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात कार चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे.

या बस अहमदाबादमध्ये आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीच्या आहेत. कोलकाता फ्रँचायझीच्या लागोपाठ ३ बसला जाण्यासाठी रस्ता बनवताना हा प्रकार घडल्याचे दिसत आहे. तसे तर, हा व्हिडिओ कितपत खरा आहे हे अस्पष्ट आहे. परंतु हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अहमदाबाद पोलिसांना धारेवर धरले आहे.

एका ट्विटर वापरकर्त्याने अहमदाबाद पोलिसांवर टिका करत लिहिले आहे की, 'पोलिसांनी एका रुग्णवाहिकेला थांबवून क्रिकेटपटूंच्या बसला आधी जाऊ दिले. गुजरातचे सरकार रुग्णांच्या प्रती किती संवेदनशील आहे, हे या घटनेवरुन स्पष्ट होते. पहिल्यांदा रुग्णवाहिकेला जाऊ द्यायला हवे होते का क्रिकेटपटूंच्या बसला?' या व्हिडिओवर नेटिझन्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

एका पोलिस अधिकाऱ्याने 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना या पूर्ण घटनेबद्दल आपले मत मांडले आहे. "आम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे. अद्याप त्या व्हिडिओतील प्रसंगाची सत्यता स्पष्ट झालेली नाही की, त्यावेळी जंक्शनवर ट्राफिक पोलिस उपस्थित होते का अहमदाबाद पोलिस? परंतु पोलिस कधीही एखाद्या व्हिआयपी व्यक्तीच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी एका रुग्णवाहिकेला अडवणार नाहीत. मग तो आयपीएल खेळाडूंचा ताफा असो वा कोणत्या मंत्री," असे त्यांनी म्हटले आहे.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतताना संघर्ष करावा लागणाऱ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी

एकच नंबर! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने घेतलेला एकहाती नेत्रदीपक झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला मृत्यूचा उल्लेख, अश्विनने दिली 'अशी' प्रतिक्रिया

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Sports
Top